fbpx

खड्डे बुजवब्यासाठी दलित पँथरने केली माझे पुणे खड्डे मुक्त अभियानाची सुरुवात

पुणे : पावसाळा अतिवृष्टी मुळे पुणे शहरातील विविध भागांतील विशेष शाळेतील रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत , यामुळे नागरिक , कामगार , शाळकरी मुले यांना प्रचंड त्रास होऊ शकतो व अपघात घडू शकतो . माणसातला माणूस म्हणून आपली जवाबदारी पार पाडू . होण्या आधी ते अपघात टाळू असे आवाहन करत दलित पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बप्पूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वात भर पावसात नागरी सेवा म्हणून आज नेहरू मेमोरीयसल हॉल चोक ते पासून पुणे स्टेशन ते पुणे कॅम्प या मुख्य रस्त्यावरचे खड्डे बुजवब्यासाठी अभियान ” माझे पुणे खड्डे मुक्त ” ची सुरवात करण्यात आली,

या मुख्य रस्त्यावर असणारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले , यावेळेस नेहरू हॉल चोक , एस जी एस मॉल समोर , रोझरी शाळा , व दस्तुर शाळा तसेच पुणे जिल्हा परिषद नवीन इमारत समोरील खड्डे बुजवण्यात आले आहे .
यावेळेस दलित संघटनेचे प्रदेश कार्यध्यक्ष जनसेवक मा इलियास भाई शेख यांनी परिश्रम घेतले , सोबत शशिकांत नाईक , शाहरुख पठाण , कुमार कांबळे , परवेज शेख ,सहभागी झाले होते ट्रॅक्टर व मुरूम , तसेच डांबर याचे काम करून पुढील काम यापुढे सुरू ठेवण्याचे मा बप्पूसाहेब भोसले यांनी जाहीर केले , तसेच पुण्यातील नेते मंडळी सामाजिक संस्था , पक्ष यांनी आपली जवादारी समजून आपल्या विभागात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे असे आवाहन बापूसाहेब भोसले यांनी केले .

Leave a Reply

%d bloggers like this: