fbpx

मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 50 गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने वीज दरवाढ, जेवणावर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी मूळ स्वीट समोर करण्यात आले. त्या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले.
या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा  तिवारी, माजी नगरसेवक आबा बागुल, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरविंद शिंदे म्हणाले,मागील 75 वर्षातील सर्वात मोठी महागाई केंद्र सरकारने केली आहे. सतत पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्व सामान्यांचे जगणे मुश्किल आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहोत. श्रीलंकामध्ये महागाईमुळे काय परिस्थिती झाली आहे. हे पाहून तरी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा आपल्याकडे देखील अशी परिस्थिती होऊ शकते. असे अरविंद शिंदे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: