fbpx

मॅक्सहबने ३ नवीन नाविन्यपूर्ण उत्पादने लाँच केली

मुंबई : परस्परांशी संवाद साधत तसेच समन्वयपूर्वक काम करता यावे यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादनांचा जागतिक पातळीवरील आघाडीचा ब्रँड मॅक्सहबने आज भारतात डिस्प्ले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डिव्हाइस पोर्टफोलिओमध्ये ३ नाविन्यपूर्ण उत्पादने लाँच केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान समाधान म्हणून लहान ते मध्यम आकाराच्या कॉन्फरन्स हॉलना या उत्पादनांचा फायदा होईल. यासोबतच क्लासरूम स्मार्ट बनवण्यातही याची मदत होईल. यामुळे मीटिंग आणि शैक्षणिक सत्रांची परिणामकारकता आणि उत्पादकता वाढेल. नवीन सादर करण्यात आलेल्या श्रेणीमध्ये रॅप्टर सीरिज एलईडी व्हिडीओ वॉल, नॉन-टच डिस्प्लेज आणि ३६० डिग्री व्हिडीओ कॅमेरा कॉन्फरन्सिंग कॅमेरा युसी एम४० यांचा समावेश आहे.

सीव्हीटीई इंडिया आणि सार्क रीजनचे कार्यकारी संचालक अविनाश जोहरी यांनी सांगितले की, “प्रगत तंत्रज्ञान आणि प्रीमियम उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह आपल्या वापरकर्ता अनुकूल संचालन, अनुकूल करण्यायोग्य उपयोजन आणि सहज देखभालद्वारे मॅक्सहबने पुन्हा एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. आमच्या ग्राहकांना अप्रतिम मूल्य प्रदान करून आगामी वर्षांमध्ये भारत आणि सार्क क्षेत्रामध्ये उकृष्ट विकास साधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

नवीन रॅप्टर सीरिज इंटिग्रेटेड ४के एलईडी वॉल डिस्प्ले आहे जी मोठ्या प्रदर्शनात आणि सहयोगांमध्ये महत्वाची उपलब्धी ठरेल. इंटिग्रेटेड स्टुडिओ-गुणवत्ता स्पीकर आवाजाची स्पष्टता वाढवतो आणि अत्याधुनिक कार्यप्रणालीच्या एकूण कामगिरीला उत्कृष्ट बनवतो. हे सहभागी आणि सादरकर्त्यांना कोणत्याही इनडोअर सेटिंगमध्ये नैसर्गिकरित्या संवाद साधण्याची सुविधा देते. आपल्या श्रेणीतील सर्वात्कृष्ट ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट रेशो, इमर्सिव्ह ४के डिस्प्ले, अप्रतिम रंग सूचकता अविस्मरणीय प्रभावाची हमी देते.

महत्त्वाची माहिती लोकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी नॉन-टच डिस्प्लेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मॅक्सहबचा ४के नॉन टच डिस्प्ले विविध ऍप्लिकेशन वातावरणासाठी सभोवतालच्या प्रकाशात उत्कृष्ट कामगिरी गुणवत्ता प्रदान करतो. हे एक बहुमुखी व्यासपीठ आहे जे विविध प्रसारण प्रणालींशी सुसंगत आहे. वायरलेस शेअरिंग, रिमोट डिव्हाईस मॅनेजमेंट, मल्टीपल-पोर्ट्स नॉन-टच डिस्प्ले या वैशिष्ट्यांमुळे हे उत्पादन अद्वितीय आहे.

३६० डिग्री यूसी एम४० कॉन्फरन्स कॅमेरा प्रत्येक चेहऱ्यावर नजर ठेवू शकते तसेच लहान ते मध्यम आकाराच्या जागांमध्ये सर्वत्र फॉलो करू शकते. ते इतके लहान आहे की ते हाताच्या तळहातावर देखील बसू शकते. हे ३६० डिग्री इमर्सिव्ह अनुभवासाठी शुद्ध स्पीकर ट्रॅकिंगसह ४-लेन्स अचूकतेची जोड देते. विलक्षण अनुभवासह याचे कव्हरेज व्यापक आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: