अभाविप कडून विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ दर्शन
शोध अंतर्गत Research Study Centre ला सुरुवात.
पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ भागाकडून अभाविप स्थापना दिनानिमित्त म्हणजेच विद्यार्थी दिनानिमित्त विद्यापीठात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला स्थापना होऊन 74 वर्ष पूर्ण झाली असून येणारे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. विद्यापीठ दर्शन अंतर्गत विविध विभागाची माहिती देण्यात आली आणि प्राध्यापकांशी प्रत्यक्ष प्रश्नउत्तराच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.
यावेळी तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रिसर्च पार्क फाउंडेशन मधील Industry 4.0 भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा समारोप ज्ञानेश्वर सभागृह मुख्य इमारत इथे करण्यात आला. यावेळी पश्र्चिम क्षेत्रीय सहसंघटन मंत्री श्री. राय सिंह, वाणिज्य शाखा अधिष्ठाता डॉ. पराग काळकर सर, पुणे महानगर उपाध्यक्षा डॉ. प्रगती ठाकूर, महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते. शोध आयामा अंतर्गत सुरू होणाऱ्या Research Study Centre च्या पोस्टर चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. राय सिंह यांनी अभाविप वाटचाल आणि विद्यार्थ्याची राष्ट्र निर्माणासाठी भूमिका यावर मांडणी केली.
अभाविप चे कार्य हे विद्यार्थांच्या प्रगती साठी असून यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्यात विद्यार्थ्यांनी नक्की सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ. पराग काळकर सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षण( विद्यापीठ) यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शोध पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक आंबादास मेव्हणकर यांनी सुरू होणाऱ्या रिसर्च स्टडी सेंटर विषयी माहिती सांगितली व त्या अंतर्गत असणाऱ्या उपक्रमाची मांडणी केली. महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो ॲबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महेश राहणे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
