fbpx

पैशांच्या जोरावर आलेले शिंदे सरकार शेतकऱ्याप्रती असंवेदनशील -खासदार सुप्रिया सुळे

पुणे: राज्यात शिंदे गटाचे व भाजपचे सरकार सत्तेवर आले उद्धव ठाकरे यांना धोका देऊन शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला मिळून हे सरकार बनवले आहे. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता आलेले शिंदे सरकार ही जनतेसाठी पैशाच्या जोरावर आलेले हे सरकार आहे . अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी या सरकारवर केली आहे.

पुण्यातील प्रति पंढरपूर असणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी मध्ये खासदार सुप्रिया सुळे पवार या दर्शनासाठी आलेल्या होत्या त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
महा विकास आघाडी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार .का हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे .त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे असतानाच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा होता आणि मित्र पक्ष म्हणून शिवसेना सोबत कायम राहो आणि आता पण सोबत आहोत. शरद पवार आदित्य ठाकरे व संजय राऊत राज्यात मध्यवर्ती निवडणुका होऊ शकतात असे म्हणत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात राजकारणात काहीही होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: