Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ती पाणीपट्टीत वाढ आणि काय ती स्मार्ट सिटी फलक लावत काँग्रेसची भाजप वर टीका

पुणे : शिवसेना बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्या काय झाडी, काय डोंगार, काय ,हाटील या समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या वाक्याचा संदर्भ घेत काँग्रेसने ‘काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणीपट्टीत वाढ आणि काय ती स्मार्ट सिटी, काय तो कोट्यवधींची घोटाळा एकदम ओके’ अशे मजकूर असलेले लावत काँग्रेसने महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या ५ वर्षाच्या कामाची व्यथा नागरिकांसमोर मांडली आहे.

शहरातील स्वारगेट भागात उभारण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी उभारलेल्या या फलकाची सध्या चर्चा सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाची २०१७ ते २०२२ या कालावधीत सत्ता होती. मात्र सत्ताकाळात भारतीय जनता पक्षाला शहर विकासाला गती देता आली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्याचा संदर्भ घेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजपच्या कारभाराची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय ते रस्त्यावरचे खड्डे. काय ती घरपट्टीत वाढ. काय ती पाणीपट्टीत वाढ. काय ती स्मार्ट सिटी. काय तो कोट्यवधींचा घोटाळा. एकदम ओके असा मजकूर या फलकांवर उभारण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने पाच वर्षात केवळ गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय बालगुडे यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading