fbpx

अ‍ॅक्सिस बँकेचा भारतीय वायू दलाशी सामंजस्य करार

मुंबई : अ‍ॅक्सिस बँक या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने संरक्षण क्षेत्राशी असलेली आपली बांधिलकी जपण्यासाठी भारतीय वायू दलाशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार बँकेतर्फे पॉवर सॅल्यूट उपक्रमाअंतर्गत सर्वोत्तम लाभ व फायद्यांसह डिफेन्स सॅलरी पॅकेज दिले जाणार आहे.

वायू दलाच्या मुख्यालयात आय. ए. एफ.सह आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्हॉइस मार्शल अशोक सैनी, व्हीएसएम, एसीएएस (अकाउंट्स आणि एव्ही) आणि एयर चीफ मार्शल व्ही आर चौधरी पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एडीसी आणि अ‍ॅक्सिस बँकेचे प्रतिनिधी – श्री. रेनॉल्ड डिसूझा, कार्यकारी उपाध्यक्ष आणि ले. कर्नल एम. के. शर्मा, नॅशनल अकाउंट्स हेड हे मान्यवर उपस्थित होते.

या खास डिफेन्स सॅलरी पॅकेजअंकर्गत बँकेतर्फे भारतीय वायू दलाचे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, कॅडेट्स/रिक्रुट्स यांना पुढील लाभ मिळणार आहेत.

  • सर्व कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, कॅडेट्स/रिक्रुट्ससाठी रू. ५६ लाखापर्यंतचे वैयक्तिक अपघात कवच
  • मुलांच्या शिक्षणासाठी रू. ८ लाखांचे अतिरिक्त कवच
  • कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास रू. ४६ लाखांचा लाभ
  • कायमस्वरुपी अंशतः अपंगत्व आल्यास रू. ४६ लाखांचा लाभ
  • हवाई अपघात कवच. रू. १ कोटी
  • गृह कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क आणि १२ ईएमआय वेवर
  • कुटुंबातल्या तीन सदस्यांसाठी अतिरिक्त मोफत शून्य थकबाकी खाते सुविधा
  • संपूर्ण भारतात वापरण्याजोगे युनिव्हर्सल खाते क्रमांक. अ‍ॅक्सिस बँकेच्या सर्व शाखा ‘होम ब्रँच’.

हा सामंजस्य करार अ‍ॅक्सिस बँकेच्या भारताच्या संरक्षण दलाची सेवा करण्याची आणि त्यांना आर्थिक गरजा, महत्त्वाकांक्षा व महत्त्वाचे टप्पे गाठण्यास मदत करण्याची बांधिलकी नव्याने अधोरेखित करणारा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: