fbpx

कला प्रदर्शनात विठ्ठलाच्या वारीची अनुभूती – वैभव जोशी

‘अक्षर विठ्ठल ‘ कॅलिग्राफी  कला प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न


पुणे  : “प्रत्येकाची व्यक्तीची इच्छा असते वारीला जाण्याची पण अनेकदा काही कारणास्तव काही जण वारीला जाऊ शकत नाही. मात्र काही कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना वारीचे दर्शन घडवतात. सुमित काटकर यांच्या या कलाप्रदर्शनातून अशाचप्रकारे विठ्ठलाच्या अनेक रूपांचे दर्शन घडते,” अशा शब्दांत कवी वैभव जोशी यांनी कलाकार सुमित काटकर यांचे कौतुक केले.
सुमित काटकर यांनी शब्दांच्या मध्यातून रेखाटलेल्या विठ्ठलाच्या विविध रूपांवर आधारित ‘अक्षर विठ्ठल ‘ या कॅलिग्राफी कला प्रदर्शनाचे नुकतेच कोथरूड येथील पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी कवी वैभव जोशी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. याप्रसंगी पी एन गाडगीळ आणि सन्स’चे अजित गाडगीळ, निवेदक मिलिंद कुलकर्णी, कलारंग कला संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, एस ए आर  इंडस्ट्रीज’चे संचालक अतुल इनामदार, माजी नगरसेवक राजेंद्र बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती घाटपांडे यांनी  केले.
या प्रदर्शनात सुमित यांनी ‘अक्षर ‘ या संकल्पनेतून
रेखाटलेली तब्बल ५० ते ६० चित्रे  पहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन १० जुलैपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८:३० पर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: