Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संजय राठोड विरोधात माझा लढा चालूच राहणार – चित्रा वाघ

पुणे : माजी वनमंत्री व शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असुन की,आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा, मी माझी लढाई अजून ही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. माझा हा लढा चालूच राहणार आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज लोणी काळभोर येथे केले.

चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

शिवसेनेचे माजी आमदार रघुनाथ कुचिक यांनी न्यायालयाने जामीन देताना घालून दिलेल्या अटींचा भंग केला आहे. तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्याबाबत माझा लढा सुरू असून त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय व जामीन रद्द केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. औरंगाबादमधील घटनेतील तरुणीलासुद्धा न्याय मिळाला नाही. या प्रकरणातील माहिती राज्यातील जनते समोर लवकरच येईल, अशी भूमिका यावेळी चित्रा वाघ यांनी मांडली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. 24 तास उलटूनही या प्रकरणात धागदोरे हाती न लागल्याने स्थानिक पोलिसांच्या तपासावर देखील चित्रा वाघ यांनी यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading