Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

घरगुती गॅस सिलेंडर आजपासून महागला

नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघणाऱ्या नागरिकांना आता घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतीना पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आलेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. किंमती वाढवण्यात आल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

घरगुती सिलेंडरचे दर

मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता १ हजार ५२ रुपये ५० पैशांना उपलब्ध होईल. तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेलाय. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइलने स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading