Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची पुणे महापालिकेला एका आठवड्याची मुदतवाढ


पुणे: महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.
१६ जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीची फोड करून तीनच्या प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली. पण ही मतदार यादी तयार करताना मोठ्याप्रमाणात घोळ झाला आहे. यामध्ये प्रारूप यादी तयार करताना क्षेत्रीय कार्यालयावर राजकीय पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी दिलेली नावे यादीत टाकली आहेत. त्यात अनेक बोगस मतदार टाकल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार आहे असाही आरोप झाला होता. त्यामुळे बहुतांश सर्व प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे हक्काचे मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.
प्रारूप मतदार यादीवर तब्बल ४ हजार २७३ नागरिकांच्या तर ५६२ राजकीय पक्षाच्या हरकती आलेल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार असल्याने ९ जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार अशक्य आहे, त्यामुळे २३ जुलै पर्यंत मुदत वाढवून द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने व्हिडिओ कॅन्फरन्सींगद्वारे बैठक घेतली त्यामध्ये १६ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जाईल असे सांगण्यात आले असून, त्याचे लेखी आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.


१६ जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी निश्‍चीत करण्यासाठी मुदत दिली आहे. या कालावधी सुमारे पावणे पाच हजार हरकतींचा विचार करताना विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या याद्या आणि प्रभागासाठी तयार केलेल्या याद्या याची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये मतदाराला यापूर्वी कोणते केंद्र दिले होते व आत्ता कोणते केंद्र आले आहे हे तपासले जाईल. त्यामुळे चुकीच्या प्रभागात नाव गेले की नाही हे लगेच कळेल आणि त्याची दुरुस्ती करता येईल.’

  • विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading