fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

दलित पँथर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 9 जुलै रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन

पुणे : दलित चळवळीत मैलाचा दगड ठरणारी ,साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारी आणि दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रखर पणे ,सडेतोड उत्तर देणारी,दलितांचा आत्मसन्मान जपणारी व स्वाभिमान जागविणारी दलीत पँथर ही एक ऐतिहासिक चलवळ होऊन गेली ..त्या पँथर ला येत्या 9 जूल्ले रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत .त्यानिमित्त रीपबलिकन युवा मोर्चा च्या वतीने दलीत पँथर साठी योगदान देणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे विशेष सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे .

सदर कार्यक्रमास जेष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी , जेष्ठ पत्रकार  मधु कांबळे , रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे , राष्ट्रीय दलित पॅंन्थरचे नानासाहेब भालेराव आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर पत्रकार परिषदेस  सुवर्णा डंबाळे , विठ्ठल गायकवाड , उमेश चव्हाण , अश्विन दोडके ,आदि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम 9 जूले रोजी सावित्रीबाई फुले सभागृह भवानी पेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे .पूर्ण राज्यभरातून या कार्यक्रमाला लोक उपस्थित रहाणार असून या वेळी दलीत पँथर या चलवळी विषयी विचार मंथन करण्यात येणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक व रीपब्लिकन युवा मोर्चा चे अध्यक्ष राहुल डबाळे यांनी दिली आहे .

यंदाचे वर्ष दलित पॅंथर या चळवळीच्या स्थापनेचे ५० वा अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने सन्मानाचे व गौरवाचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading