Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

ऑनलाइन संगीत क्लासेस ते ऑडिओ कंपनीची उभारणी; पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची कामगिरी

पुणे:  मार्च २०२० साली  सुरू झालेल्या करोना महामारीमुळे अनेक  विद्यार्थ्यांची स्वप्ने व महत्वाकांक्षा उद्ध्वस्त झाल्या. पण या कठीण काळात न डगमगता पुण्यात शिकणारी २४ वर्षीय विद्यार्थिनी स्वप्नाली गायकवाड हिने गेल्या दोन वर्षात ऑनलाइन संगीत क्लासेस ते स्वतःची म्युझिक कंपनी एवढी मोठी मजल मारली आहे. मूळची लातूरची  व सध्या पुण्याच्या एमआयटी  विश्वशांती संगीत कला अकादमीची  विद्यार्थिनी असणाऱ्या स्वप्नालीने पुण्यामध्ये आपल्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून भारतीय शास्त्रीय संगीतचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली होती. पण करोनाच्या काळात आरोग्य सुरक्षिततेच्या नियमांमुळे, तिला आपले संगीताचे वर्ग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेणे भाग पडले.

स्वप्नाली गायकवाड  म्हणाली की , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “डिजिटल इंडिया” या उपक्रमातून प्रेरणा घेऊन मी  सोशल मीडिया माझ्या अकाउंटद्वारे जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मी या उपक्रमाबद्दल ज साशंक होते. पण मला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मला भारता बरोबरच अमेरीका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि फ्रान्समधील  विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या क्लासला नाव नोंदवले. तसेच मला अजून  सुखद धक्का बसला जेव्हा पाकिस्तानातील एक विद्यार्थी तसेच जपानमधील इंग्लिश ही न-बोलू शकणाऱ्या विद्यार्थ्यांने माझ्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्लासला नाव नोंदणी केली.

या ऑनलाइन क्लासेसमध्ये मी भारतीय शास्त्रीय (हिंदुस्थानी), सेमी-क्लासिकल, भक्तिगीत,बॉलीवूड संगीत हे प्रकार विद्यार्थ्यांना शिकवते आहे. मार्च २०२० पासून जेव्हा कोविड महामारी सुरू झाली ते आतापर्यंत मी जगभरातील जवळपास ५४६ विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या भारतीय शास्त्रीय संगीत शिकवले आहे. सध्या, १५० हून अधिक विद्यार्थी माझ्या ऑनलाइन क्लासमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहेत.

हिसेल विल्यम्स ही जपानमधील विद्यार्थिनी, जिने स्वप्नालीच्या ऑनलाइन क्लासेसमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. ती आपल्या अनुभवाबद्दल म्हणाली की, स्वप्नालीने  मला भारतीय शास्त्रीय संगीत हे खूप आत्मीयतेने शिकवले.  शिवाय मला हिंदी किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा येत नसताना ही अगदी संयमाने तिने मला संगीत शिकवले.  या गोष्टीमुळेच मला भारतीय संगीत शिकण्यास खूप मदत झाली.

आता स्वप्नालीने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्रातील तरुण कलाकार व लोककलाकारांना संगीत क्षेत्रात संधी देण्याकरीता स्वतःची म्युझिक कंपनी ‘आफ्टर ड्रीम एंटरटेनमेंट’  सुरु केली आहे. कोविड महामारीमुळे आपली कमाई गमावलेल्या संगीत कलाकारांना आणि तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या तरुण व होतकरु कलाकारांना ‘आफ्टर ड्रीम एंटरटेनमेंट’ हे  व्यासपीठ देणार आहे.

सध्या स्वप्नालीची कंपनी परभणी येथील तरुण साईराज घुगे आणि बीडच्या प्रतीक्षा घुले, यांच्या म्युझिकल अल्बमची निर्माती करत आहे. हे  अल्बम येत्या काही दिवसात रिलीज होतील. शिवाय आफ्टर ड्रीम एंटरटेनमेंट हे तरुण कलाकारांना  त्यांच्या संगीत कलाकृतीद्वारे विविध ऑनलाईन व्यासपीठातून कमाई करण्यासाठी मदत करण्याची योजना आखत आहे. अशी ही माहिती स्वप्नालीने दिली.

स्वप्नाली गायकवाडच्या कुटूंबा मध्ये कोणती ही संगीताची पार्श्वभूमी नाही. तिचे पालक हे दोघे पेशाने शिक्षक आहेत. स्वप्नालीने वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीत शिकणास सुरुवात केली. तिचे संगीत शिक्षक पं. बाबुराव बोरगावकर यांनी तिला प्रोत्साहन दिले.  स्वप्नालीने अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.  पण तिला अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच समजले की तिची ओढ ही  संगीताकडे आहे. तिने त्याचवर्षी  अभियांत्रिकी अभ्यासक्रम सोडून संगीत शिकण्यास सुरवात केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading