Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

‘फंद-फीतूरीस’ ईनाम व राजाश्रय देणारे ‘शिव छत्रपतींचे हिंदूत्व’ नव्हते…! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘फंद-फीतूरीस’ ईनाम देत, संविघानास तिलांजली देत, छिना-छिपटीस’ राजाश्रय देणारे ‘शिव छत्रपतींचे हिंदूत्व’ नव्हते…! भाजप नेतृत्वाकडून केंद्रीय सत्तेच्या आधारे ‘मविआ’तील घटक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून, संविधानास तिलांजली देत, कट – कारस्थानांनी सत्ता हस्तगत करणे, हे शिवछत्रपतींना अपेक्षीत हिंदूंत्व व राजधर्माचे राजकारण नाही अशी ऊपरोधीक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर प्रतिक्रीयापर केली..!
तथाकथित हिंदूत्वाचा डंका पिटणाऱ्यांच्या लक्षात हवे की, स्वातंत्र्य पुर्व काळात ब्रिटीशांना वा मुगल बादशहा औरंगजेब आदींना ‘फंद-फितूरीने अंकीत राहणारे’ पसंत होते व त्यांना राजाश्रय ही मिळत असे…!
मात्र ‘स्वात्रंत्योत्तर लोकशाही रूपी भारतास ‘संविघानाचा घटनात्मक कणा’ असुन, ‘लोकशाहीच्या ४ ही स्तंभावर’ संघराज्य रुपी हा भारत टिकून आहे.. त्यामुळे संविधानिक नियमांची-मुल्यांची, सत्तेच्या लालसेपोटी मनमानीपणे केली जाणारी तोडमोड ‘भारतीय लोकशाही’ला हितावह नाही.. त्यामुळे लोकशाहीच्या ‘इतर जबाबदार ३ स्तंभां कडून’ याकडे मुग गिळून दुर्लक्ष होणारी नाही.. याची अजूनही खात्री व विश्वास वाटत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्पष्ट केले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading