Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – शहरात आज पासून एका दिवसाड पाणी ; ११ तारखेपर्यंत पर्यंत असे असणार पाण्याचे वेळापत्रक

पुणे: शहराला सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पहिल्या टप्प्यात आठवडाभरासाठी ही कपात असून पावसाचा अंदाज घेऊन ती वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार, अर्ध्या भागाला एक दिवशी तर उर्वरित भागाला दुसर्‍या दिवशी असे सम- विषम तारखाप्रमाणे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी ज्या भागाला पाणीपुरवठा होईल त्या भागाला थेट बुधवारीच पाणीपुरवठा होणार आहे.

4, 6, 8 जुलै रोजी होणारा पाणीपुरवठा:
संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, वाघजाईनगर, अटल अकरा हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, बालाजीनगर संपुर्ण परिसर, महादेवनगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरानगर, अप्पर, पद्मावती, चव्हाणनगर, अप्पर पंपींग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकारनगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोमेंट, औंध, सकाळ नगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरुड, जय भवानीनगर, किष्कींधानगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शात्रीनगर, आनंद नगर, वनदेवी मंदिर, श्रमीकनगर, बावधन बु. भुसारी कॉलनी, मयुर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वेनगर, अहिरेगांव, धानोरी गावठाण, लोहगांव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगांव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा खु., पुणे कॅन्टोमेंट.


8 , 7, 9 व 11 जुलै रोजी पाणीपुरवठा होणारा परिसर :
वडगाव जलकेंद्र परिसर, उंबर्‍या गणपती चौक, नांदेडफाटा, धायरी, राजस सोसायटी, वडगांव गावठाण, वडगांव बु. जयभवानी नगर, माणिकबाग, हिंगणे परिसर, तुकाईनगर, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, वंडरसिटी, आंबेगाव पठार, सहकार नगर, आंबेगाव बु., दांडेकर पुल, नवीन पेठ, दत्तवाडी, सर्व पेठा, टिळक रस्ता, स्वारगेट परिसर, जनता वसाहत, पर्वती जलकेंद्र परिसर, चतुशृंगी पाणीपुरवठा विभाग, गोखले नगर, भोसले नगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता परिसर, लॉ. कॉलेज रस्ता परिसर, भांडारकर रस्ता परिसर, प्रभात रस्ता परिसर, डेक्कन, जंगली महाराज रस्ता परिसर, बोपोडी, खडकी रेल्वे स्टेशन परिसर, जुना पुणे मुंबई रस्ता परिसर, बाणेर गाव, बालेवाडी, सूसरोड, बाणेर पाषाण लिंग रस्ता परिसर, सायकर मळा, सुतारवाडी परिसर, सुस गांव म्हाळुंगे, चांदणी चौक, बावधण बु. दशभुजा गणपती, नळस्टॉप, मंबई पुणे बायपास दोन्ही बाजू, वारजे, माळवाडी, वारजे जुना जकात नाका परिसर, इंगळे नगर, कळस, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, संजय पार्क, साकोरे नगर, विमान नगर, रामवाडी, मुळीक नगर, वडगांवशेरी, टेम्पो चौक, गलांडे वस्ती, साईनगर, संपूर्ण येरवडा, संगमवाडी, आळंदी रस्ता, फुले नगर, टिंगरे नगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, वैदुवाडी, हडपसर गावठाण, सय्यद नगर, ससाणे नगर, काळेबोराटे नगर, वानवडी, आझाद नगर, बी.टी. कवडे रस्ता, घोरपडी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading