Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे भाजप च्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले. यानंतर आज त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केले. प्रथम आवाजी आणि त्यानंतर शिरगणती पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला.

शिरगणती नंतर भाजप व शिंदे गटाला 164 मत मिळाली. तर महाविकास आघाडीच्या बाजूने 99 मत पडली. कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांना सभागृहाची दारे बंद झाल्याने सभागृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे या बहुमत चाचणीत ते मतदान करू शकले नाही. समाजवादी पार्टी आजही तटस्थ राहिली. बहुमत चचणी दरम्यान विधीमंडळाचे कामकाज हे लाईव्ह दाखवण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading