Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘या’साठी मनसे -शिवसेना एकत्र

मुंबई : ठाकरे सरकारने स्थगीती दीलेल्या ‘मेट्रो ३’साठीचे आरे येथील कारशेडला नव्या शिंदे सरकारने सत्तेत येताच पुन्हा मान्यता दिली आहे. मुंबईच्या पर्यावरणाचा विचार करता माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केला. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याला विरोध केला आहे. विशेष म्हणजे आता मनसेनेही शिवसेनेच्या या मागणीत आपला सुर मिसळला असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील आरे कॉलनी येथे होवू घातलेल्या मेट्रो काराशेडला विरोध केला आहे.

तर राजकारणात माणुस नावाचा प्राणी शिल्लक राहणार नाही – अमित ठाकरे  

अमित ठाकरे यांनी फेस बुकला पोस्ट शेअर करत या मेट्रो काराशेडला विरोध केला आहे. त्यांनी असे म्हटंले आहे की,    “मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी शेकडो तरुण-तरुणींना संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं”. आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान राजकीय नेत्यांना बाळगायला हवं. नवे मुख्यंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा ही आग्रहाची विनंती”.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading