Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहन उपासनी यांची नियुक्ती

पुणे : महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन(मास्मा)ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात पार पडली. यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहन उपासनी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणीमध्ये सचिव – स्वप्नील बाठे, सामाजिक सचिव – अमित कुलकर्णी, खजिनदार- शशिकांत वाकडे, संचालकपदी समीर गांधी, अतुल होनोले, आशिष मुळे, मनिषा बारबिंड, नरेंद्र पवार, जयेश अकोले यांची नियुक्ती झाली. पुर्वीचे अध्यक्ष राजेश मुथा यांनी रोहन उपासनी यांच्याकडे पदभार दिला. यावेळी मुथा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा सादर केला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सुशिल पुंगलिया, सुहास घोटीकर, मंगल अकोले, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.

मास्माचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन उपासनी म्हणाले की, “ओन्ली बिझनेस नथिंग एल्स” म्हणजे व्यवसायाव्यतिरिक्त काही नाही हे ब्रीद वाक्य संपूर्ण यशस्वी करण्याचे नवीन कार्यकारणीचे उदिष्ट आहे. लॉकडॉऊननंतर जास्तीत जास्त सोलार व्यवसाय वाढविण्यासाठी लागणाऱ्या धोरणांमध्ये कसे बदल करता येतील, महावितरणमध्ये सर्वात जास्त काम असल्याने तेथील प्रक्रिया कशी सुलभ करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी “सोलार टेंडर सेल” अशी नवीन संकल्पना आम्ही आणत आहोत. शासनातर्फे अनेक निविदा निघतात आणि त्याची माहिती सर्वसामान्य सभासदांना नसते त्यामुळे सहभाग कमी असतो. या टेंडर सेल मार्फत संपूर्ण प्रक्रिया ही योग्य पद्धतीने होणार आहे. कुशल मनुष्यबळ असलं की वेळेची आणि पैश्यांची बचत होऊ शकते आणि कामे वेळेत होऊ शकतात. त्यामुळे “सूर्य मित्र” संकल्पना राबविण्यात येणार असून त्याद्वारे बेरोजगारीवर मात करता येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन एक वर्षाची कार्यशाळा घ्यायची आमची योजना आहे. जेणेकरुन बेरोजगारी कमी होऊन कुशल मनुष्यबळ वाढीस मदत होईल. संघटनेमध्ये पारदर्शकता वाढवण्याकडे नविन कार्यकारणीचा भर असल्याची माहिती उपासनी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading