fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsSports

पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे २ जुलै पासून आयोजन !!

पुणे :  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ जुलै ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक आणि स्पर्धेचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे उध्दघाटनाचे वर्ष असून आंतरक्लब स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातील एकूण १० निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा प्रत्येक सामना हा ३०-३० षटकांचा असणार असून अंतिम सामना ४०-४० षटकांचा असणार आहे. आठवड्याच्या दर शनिवारी आणि रविवारी स्पर्धेचे सामने होणार आहेत.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अ आणि ब संघ, २२ यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एनएसएफए-पुणे, सनराईझ क्रिकेट स्कूल, खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमी, निंबाळकर वॉरीयर्स, एके स्पोर्ट्स, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी व स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमी या १० निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला मेडल्स् आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ संघ आणि सनराईझ क्रिकेट स्कूल या दोन संघांमध्ये होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading