Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

BIG BREAKING – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; आमदारकीचाही त्याग

मुंबई : ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला, ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्यांना बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली ओढण्याचे पुण्य लाभत असेल तर त्यांना ते लाभूदयात, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही. आज आज न्यायालयाचा निकाल मला मान्य आहे. ज्यांच्यासाठी आगमनासाठी उद्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था मागावण्यात आली आहे. त्यांना येऊदेत कोणीही त्यांच्या मार्गात येवू नये. ज्यांना सत्तेची लालसा आहे त्यांना ते भोगूदया, असेही ते म्हणाले.

मागील नऊ दिवसांपासून महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्याचा समारोप रात्री उशिरापर्यंत चाललेल्या विविध राजकीय घडामोडीने झाला. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांना घेऊन गुहावाटीला पलायन केल्यापासून सुरू असलेले राजकीय नाट्य आज जवळपास संपले आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणी होणार नाही हे स्पष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading