fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

महाराष्ट्राच्या प्रगतीत व स्थैर्यात खीळ घालणारा भाजपचा सत्तालोलुप – हव्यास अखेर ऊधड… काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे – ‘सेना नेतृत्वास अर्ध कालावधीत खाली खेचुन, सरकार पाडण्याचे कुकर्म सेनेच्या बंडखोरांना करावयास लावून, भाजप नेतृत्व महाराष्ट्राची स्थिरता व प्रगतीत खीळ घालून, राज्यास अनेक वर्षे मागे खेचण्याचेच पाप करत आहे, याचा खरेतर बंडखोरांनी बोध घ्यायला हवा असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले व ‘बंडखोरांना सतर्क करण्याचा प्रयत्न’ काँग्रेस एकवार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. ‘*पंचवार्षिक कालावधीत’ उर्वरीत काळ मविआ’चे अपयश दाखवण्यासाठी भाजप पुढील २।। वर्षात काहीही करणार नाही हे स्पष्ट असुन, पुन्हा “मविआ’च्या अपयशाचाच् नकारात्मक प्रपोगंडा करत” त्याचे खापर येत्या निवडणूकीत पुन्हा ‘मविआवर’(अर्थात सेनेवर) फोडेल, एवढे *साधे राजकारण व संभाव्य धोका ‘सेनेचेच आमदार म्हणवणाऱ्या बंडखोरांच्या लक्षात येऊ नये (?) याचे सखेद आश्चर्य वाटते…! सेनानेते  संजय राऊत व युवानेते  आदित्य यांची वेगना व संताप समजू शकतो, परंतू त्यांनी मविआ’च्या स्थिरतेसाठी संयमी व सांमजस्याची भूमिका घ्यावी असे मित्रपक्ष म्हणून जरूर वाटते आहे..
बंडखोरीचे संकट शिवसेने पुरते मर्यादीत नसून, मविआ सरकारच्या लोकाभिमुख कामात व कारकिर्दीत खीळ घालणारे आहे, चांगल्या कामावर पाणी टाकणारे आहे व यात भाजपची पडद्यामागील कुटनिती स्पष्ट आहे..
बंडखोर आमदारांनी सेनाप्रमुख व मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे यांचे आवाहनावर गांभीर्याने व प्रगल्भतेने विचार करून, महाराष्ट्राच्या हिताचे चाललेले काम लक्षात घेता ‘सेनेच्याच् नेतृत्वाखालील’ सरकारच्या स्थिरतेचा निर्णय घ्यावा…
खरेतर *शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद सेना बंडखोरांच्या मुळे संपुष्टात आणण्याची नामुष्की शिवसेनेवरच आल्याने…दैव देते व कर्म नेते’ असे म्हणावे लागेल काय *(?) हे मित्रपक्षाने ‘राज्याप्रती राजधर्म निभावतांना’ सांगणे गरजेचे वाटल्यामुळेच हे आवाहन ‘मविआच्या स्थिरतेसाठी व किमान समान कार्यक्रमाच्या संकल्पपुर्ती’ साठी एकवार करत असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले…!
वास्तविक महाराष्ट्रास कर्जबाजारी करून २०१९ निवडणुकी नंतर भाजप ने सत्ता स्थापने पासून पळ काढला.. तेंव्हा ‘प्राप्त परिस्थितीत’ पुरोगामी महाराष्ट्रातील ३ पक्षांनी राजकीय प्रगल्भतेने ‘मविआ’ सरकार स्थापन करून जनतेस लोकाभिमूख सरकार दिले.. “सत्तेवर आल्यावर राज्यात कोरोना, चक्री वादळ, अतीवृष्टी आदी संकटाशी मविआ’ने यशस्वी मुकाबला केला त्याची न्यायालयांनी ही दखल घेतली.. व हेच भाजप ला पहावले नाही”..
मविआ सरकारचे लोकप्रिय व लोकहिताचे शासन आदेश ‘जनतेच्याच हिताचे’ असलेमुळे भाजप ला पोटदुखी झाली व त्यामुळेच् त्या ‘जीआर’ची माहीती राजापालांनी मागविली असे देखील काँग्रेस नेते व राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading