fbpx

यश मिळविण्यासाठी जिद्दीबरोबरच मनही शुद्ध हवे – कुस्तीपटू राहुल आवारे

पुणे : खेळासह कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी जिद्दीबरोबरच आपले मनही शुद्ध असायला हवे, हा माझ्या गुरुंचा सल्ला मी मानला आणि म्हणूनच आज मी कुस्तीमध्ये यश मिळवू शकलो, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू राहुल आवारे यांनी यावेळी केले.

पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने गुणवंत खेळाडूना आवारे यांच्या हस्ते एकूण 4,39,000/-  रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. क्लबचे जनरल सेक्रेटरी गिरीश इनामदार व फायनान्स सेक्रेटरी मिहिर केळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सध्या राज्य राखीव पोलिस दलाचे डेप्युटी कमांडंट असलेले राहुल आवारे हिंद केसरी (कै.) हरिश्चंद्र बिराजदार यांचे पठ्ठे होते. आवारे यांनी कुस्तीत देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. या प्रवासाचा आढावा आवारे यांनी आपल्या भाषणात घेतला. कुस्तीत अत्युच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातला संघर्ष आवारे यांनी यावेळी उलगडून दाखवला. आपल्या गुरुंच्या आठवणीने आवारे यावेळी भावूक झाले.

या कार्यक्रमात एकूण 67 खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये टेबल टेनिस – प्रिथा वर्टीकर, रजत कदम; टेनिस- वैष्णवी आडकर, आर्यन कोठस्थाने, अर्जुन कढे, अर्णव पापरकर, अस्मी आडकर, नील केळकर, मल्लिका करमरकर, अर्जुन करमरकर, नितीन कीर्तने; क्रिकेट-अथर्व वनवे, आत्मन पोरे, यश बोरामणी, धीरज पतंगरे, अजय बोरुडे, राहुल त्रिपाठी, स्वप्नील फुलपगार, आशय पालकर, मुकेश चौधरी, स्वप्नील गुगळे; रग्बी- पूजा भाले, वहाबीज भरुचा; जलतरण – आयुष पुंडे, आर श्रीजन रेड्डी, विराज ढोकळे, रुतुराज बिडकर (जलतरण/वॉटरपोलो), प्रथमेश सोनार, रमेश विपत, सायली ठोसर, मेघ ठकार, शशांक कुलकर्णी; व्हॉलीबॉल – अकिब शेख, अनिकेत बड्डी, ईश्वरी शिंदे, तन्वी देशपांडे, वेदिका शिंदे, प्रवीण बाबर, विशाल चेमटे, मल्हार ठोंबरे, गौरव भोंगाडे, सेली नसेरी, ऐश्वर्या जोशी; अॅथलेटिक्स – पौर्णिमा मारणे, इरा देवकुळे, मनोज रावत, निशांत जोशी, बाबुराव सावर्डेकर; बॅडमिंटन- प्रेरणा जोशी, बास्केटबॉल- हर्षवर्धन पाटील या खेळाडूंनी आपापल्या क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: