fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

टॅली एमएसएमई ऑनर्स २०२२ मध्ये पुण्यातील तीन कंपन्यांनी मिळवला मोठा सन्मान

पुणे सॉफ्टवेअर उत्पादने उद्योगातील अग्रणी असलेल्या टॅली सोल्युशन्सने पश्चिम विभागासाठी एमएसएमई ऑनर्सच्या दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. विनपॅक मशीन प्रायव्हेट लिमिटेडएबीके इम्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बांबू इंडिया या पुण्यामधील तीन कंपन्यांनी २०००  जागतिक नामांकनांमधून बाजी मारली.

टॅली एमएसएमई ऑनर्स हा टॅली सोल्युशन्सने राष्ट्रीय आर्थिक स्तरापर्यंत तळागाळात पोहोचणाऱ्या त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे एमएसएमईची विविधता आणि अथक योगदान साजरे करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे. हे सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त दिले जातात आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध GSTIN असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतात.

विनपॅक मशीन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवीण गर्दे आणि एबीके इम्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे कुशल आणि आनंद पिट्टी यांना डिजिटल ट्रान्सफॉर्मर‘ श्रेणीत गौरविण्यात आले. अधिक सेवा-केंद्रित पुरवठादारांच्या गरजेसाठी विनपॅक मशिन्सने EDM (इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग) बाजारपेठेमध्ये अंतर पाहिले. त्यांनी संपूर्ण भारतभर अधिक कार्यक्षमतेने सेवा प्रदान करण्यासाठी अंतर्गत दैनंदिन कामकाजासाठी मध्यवर्ती एकात्मिक सीआरएमचा अवलंब केला आणि त्यांच्या महसुलात २०% वाढ झाली. कंपनीच्या चालू प्रक्रियेच्या मॅन्युअल नियंत्रणापासून डिजिटल पर्यवेक्षणापर्यंत जाण्यासाठी एबीके इम्पोर्ट्स ओळखले गेले आहे. त्यांच्या दृष्टिकोनाने  कर्मचार्‍यांना लाइव्ह स्टेटस अपडेट्स आणि ऑटोमेटेड प्रोसेसिंगने सक्षम बनवले आहे.

बांबू इंडियाचे योगेश आणि अश्विनी शिंदे यांना नेक्स्टजेन आयकॉन‘ श्रेणीत गौरविण्यात आले. ही अनोखी कंपनी विविध प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेली उत्पादने केवळ बांबूच्या माध्यमातून बनवते. बांबू इंडिया बांबूपासून टूथब्रशकंगवानोटपॅडपेनस्पीकर आणि वैयक्तिक काळजीची उत्पादने बनवून प्लास्टिकचा वापर रोखण्याच्या मोहिमेवर आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण बांबू उत्पादनांचा प्रचार करून जगभरात १० लाख किलो प्लास्टिक कचरा कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

डीबीएस (डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड) आणि प्रादेशिक व्यापार संघटना यांच्या सहयोगाने टॅली एमएसएमई ऑनर्सने त्याच्या दुसऱ्या आवृत्तीत पुण्यामधील तीन एमएसएमई आणि भारतातील ९ एमएसएमईला मान्यता दिली. देशातील चार विभागांत (पूर्वपश्चिमउत्तर आणि दक्षिण) साजरे करण्यात आलेले हे सन्मान पाच श्रेणींमध्ये देण्यात आले:

•    वंडर वुमन: अशा महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी ज्यांनी अडचणींना तोंड दिले, यशस्वी व्यवसायाची उभारणी केली आणि व्यावसायिक समुदायासाठी एक आदर्श बनल्या.

•    बिझनेस मेस्ट्रो: उद्योगातील दिग्गज हे तरुण उद्योजकांसाठी प्रेरक आधारस्तंभ आहेत. हे अशा व्यवसायांचा सन्मान करण्यासाठी आहे ज्यांनी काळाच्या कसोटीवर टिकून राहून प्रगती सुरू ठेवली आहे.

•    नेक्स्टजेन आयकॉन: स्टार्ट-अप हे तरुण नेत्यांसारखे असतात जे पारंपारिक व्यवसाय प्रॅक्टिशनर्सना वेगवान उपाय सुविधा देतात. हे अशा स्टार्ट-अप्सचा सन्मान करण्यासाठी आहे ज्यांनी बाजारातील दरी ओळखून नाविन्यपूर्ण उपाय सादर केले आहेत.

•    डिजिटल ट्रान्सफॉर्मर: जे व्यवसाय गतीशील आहेत आणि चांगले परिणाम साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यांचा सन्मान करण्यासाठी.

•    चॅम्पियन ऑफ कॉज: हे अशा व्यवसायांना सन्मानित करण्यासाठी आहे ज्यांनी जागतिक कल्याणासाठी चांगल्या हेतूने योगदान दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading