एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे भाजप दिसत नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा देणार आहेत. हे सरकार कसं टिकेल यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झालं आहे. आदित्य ठाकरेंचाही फोन आला होता. त्यामुळे मीडियाला विनंती आहे की, यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे भाजप दिसत नाही  असे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री  पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

अजित पवार म्हणाले,, शिवसेनेतील अंतर्ग प्रश्न त्यांचेच नेते चांगलं सांगतील. सूरतला गेलेले काही आमदार परत आले आहेत. त्यांची भूमिका त्यांनी मांडली. गुवाहाटीमध्ये गेलेल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. त्यामुळे आमची भूमिका, पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकण्याची आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आमचे मित्र पक्ष वेगवेगळं स्टेटमेंट करतायत. सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. तेव्हा ३६ पालकमंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यांना देण्यात आला. यामध्ये एक तृतीयांश शिवसेना, एक तृतीयांश काँग्रेस आणि एक तृतीयांश राष्ट्रवादीच्या आमदारांना पालकमंत्रीपद देण्यात आले. अर्थसंकल्पात जो निधी ठरवण्यात आला तोच निधी सर्व पालकमंत्र्यांना देण्यात आला. कोणासाठीही कटछाट करण्यात आलेली नाही. पण काटछाट केली असल्याचा अफवा पसरल्या जात आहेत. निधीवाटपात मी कधीही दुजाभाव केला नाही. विकासकामांमध्ये विकास करण्याची भूमिका असते. सकाळी साडेआठ- नऊलाच ऑफिसला येऊन बसतो आणि प्रश्न सोडवण्याचं काम करतो. त्यामुळे कोणत्याही पालकमंत्र्याने कोणत्याही माध्यमासमोर जाऊन बोलण्यापेक्षा आम्हाला येऊन सांगितलं तर तिथल्या तिथे समज-गैरसमज दूर झाले असते. आमच्या तिघांची आघाडी आहे, त्यामुळे आताच्या परिस्थिती ही आघाडी कशी टिकेल याचा प्रयत्न असेल असं अजित पवार म्हणाले.

तिथे गेलेले लोक किती स्वखुशीने गेले आणि किती लोग बळजबरीने गेले हा संशोधनाचा भाग आहे. अनेकांना इकडे यायचं आहे. तिथले मतदारसंघात बघितले तर त्यांचे शिवसैनिक शांत आहेत. मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. शिवसेनेत ज्या ज्या वेळेस अशाप्रकारचे बंड झाले तेव्हा नेते बाजुला पडले, कार्यकर्ते त्यांच्या मागे गेले नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: