‘संविधान दिंडी’तून पालखी सोहळयात जागृती

पुणे : आषाढी वारीत पुणे मुक्कामी ‘संविधान दिंडी’ या उपक्रमातून भारतीय संविधानाविषयी जागृती करण्यात आली. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)चा या उपक्रमात पुढाकार असून पुण्यातील कार्यक्रमात संविधानाचा प्रसार करणाऱ्या समतादूतांचा सन्मान करण्यात आला.पुणे येथे २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ए.डी.कॅम्प चौक(नाना पेठ) येथे लोकशाहीर संभाजी भगत यांचा ‘संविधान जलसा’ हा कार्यक्रम झाला. खंजिरीवादक कीर्तनकार तुषार सूर्यवंशी यांनीही कीर्तनातून प्रबोधन केले. ज्येष्ठ सिनेअभिनेते नसिरूद्दीन शाह, अभिनेत्री रत्ना पाठक यांनी व्हीडीओ संदेशद्वारे शुभेच्छा दिल्या.

बार्टीचे महासंचालक धम्मदीप गजभिये,आमदार सुनील कांबळे,संजय नहार,निलेश नवलखा,डॉ अमोल देवळेकर शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, बार्टी संस्थेच्या वृषाली शिंदे, उमेश सोनवणे तसेच पल्लवी जावळे, भोलासिंह अरोरा,चांदबी नदाफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

‘रक्षण तुझी माझी, हे संविधान करते ‘ अशी सुरुवात सप्त खंजिरीवादक कीर्तनकार तुषार सूर्यवंशी यांनी केली.लोकशाहीर संभाजी भगत यांनी संविधान आणि संत साहित्याचे संगीत चिंतन सादर केले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

होप स्टुडियो’चे संस्थापक डॉ अमोल देवळेकर,संचालक विकास सोनताटे यांनी स्वागत केले . ‘भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत खरा नागरिक घडविण्याची रुजवणूक संतांच्या शिकवणीत असल्याने वारीत संविधानाविषयी जागृती करणारे उपक्रम केले जात आहेत’,असे डॉ.अमोल देवळेकर यांनी सांगितले.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी संविधान जलसा ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. संविधान व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येत आहे. या प्रती वारीत वितरित केल्या जात आहेत. अभंग, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संविधानाची मूल्ये प्रसारित केली जात आहेत. दृकश्राव्य माध्यमातून तसेच समाज माध्यमातून संवाद केला गेला.

‘संविधान दिंडी’द्वारे भारतीय राज्यघटनेचे मूल्य रुजविण्यासाठी देहू-आळंदी ते पंढरपूर मार्गावर १५ दिवस सर्व पातळ्यांवर प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे.

दरम्यान २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता येरवडा येथे ‘बार्टि’ चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, लोकशाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितित या संविधान दिंडीचे स्वागत झाले.

Leave a Reply

%d bloggers like this: