शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना 24 तासांचा ‘अल्टिमेटम’

शिवसेना ‘मविआ’ मधून बाहेर पडायला तयार आहे; आधी मुंबईत या – संजय राऊत  

मुंबई : शिवसेना ‘मविआ’ मधून बाहेर पडायला तयार आहे. पण तुम्ही आधी 24 तासात मुंबईत परत या. अन् पक्ष प्रमुखांकडे तुमची बाजू मांडा नक्की तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल, असे स्पष्ट विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

राऊत म्हणाले, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुंबईत यावे. आल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी.

पुढे बोलताना ते म्हणाले, बंडखोर आमदारांनी खूप मोठी चूक केली आहे. आमच्या या आवाहना नंतर शिंदे गटातील 20 ते 25 आमदार परत येतील, अशी आमची अपेक्षा आहे. चर्चा झाल्यावर पुढील निर्णय घेवू. जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल ती परतही मिळवता येईल, असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: