fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

सेंट गोबेनने पुण्यात केले आपल्या खास ‘MyHome’ स्टोअरचे उद्घाटन

पुणे : सेंट गोबेन ही एक ही हलक्या आणि शाश्वत बांधकामाच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रेसर कंपनी असून, “मेकिंग द वर्ल्ड अ बेटर होम” हे तिचे ब्रीदवाक्यआहे. १३५ कोटी लोकांचे वसतीस्थान असणा-या आणि शहरीकरणाचे प्रमाण ३२ टक्‍के असणा-या भारत देशामध्ये येत्या वर्षांमध्ये हजारो घरे उभारण्याची गरज भासणार आहे. पॅनडेमिकमुळे आपले काम, आपले शिकणे सारे काही घरातूनच केले जात असल्याने आपली घरे ही आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी आली आहेत. घरे उभारणीच्या या कामात लागणा-या साहित्याच्या मागणीत वेगाने वाढ होत असताना सेंट-गोबेनने शॉवर क्युबिकल्स, खिडक्या, किचनची शटर्स, वॉर्डरोब शटर्स, एलईडी आरसे, काचेचे रायटिंग बोर्डस्, जिपरॉक सिलिंग्ज, ड्रायवॉल्स, टायलिंग आणि ग्राउटिंगसाठीचे साहित्य, जिप्सम प्लास्टर, विशिष्ट टीड रूफिंग शिंगल्स आणि नोव्हेलियो वॉल कव्हरींग्ज यांसारख्या घरउभारणीशी निगडित सर्व गरजा पुरविणारी आणि नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित केली आहेत. सेंट-गोबेनने या सर्व उपाययोजना MyHome या वन-स्टॉप फिजिटल स्वरूपातील व्यवसायाच्या रूपात आणल्या असून, या विक्रीकेंद्रांद्वारे रचनेपासून ते जोडण्यांपर्यंतच्या सर्व कामांसाठी लागणारे साहित्य ग्राहकांना उपलब्ध केले गेले आहे.

पुणे हे शहर भारतातील आयटी क्षेत्राचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते आणि पुण्याचा विकास अत्यंत जोमाने सुरू आहे. २०२१ मध्ये पुण्यातील निवासी जागा आणि घरांच्या बाजारपेठेमध्ये लक्षणीय तेजी आल्याचे विशेषत्वाने आढळून आले. या बाजारपेठेचा आकार प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि इथून पुढेही यात केवळ वाढच होत राहील असा अंदाज आहे. पुणे ही महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे आणि इथल्या रिअल्टी मार्केटचा विस्तार होत असताना, घरांना आरामशीर बनविणा-या, त्यांच्या स्वच्छता आणि आरोग्याची तसेच स्वास्थ्याची काळजी घेणा-या उपाययोजनांना असलेल्या मागणीनेही मोठी उसळी घेतली आहे. घरउभारणीच्या साधनांना बाजारपेठेत वेगाने वाढणारी ही मागणी पूर्ण करण्यासाठी सेंट-गोबेन इंडियाने शहरातील दोन ठिकाणी आपली MyHome शोरूम्स सुरू केली आहेत.

सेंट-गोबेन इंडिया प्रा. लि.चे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर हेमंत खुराणा म्हणाले, “आज पुण्यामध्ये खास MyHome शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. पुणे ह एक विस्तारती आणि आशादायक बाजारपेठ आहे, आणि या बाजारपेठेला आमची उत्पादने पुरविण्यास आम्ही उत्सुक आहोत. या स्टोअरमुळे पुण्यासारख्या विस्तारत्या बाजारपेठांशी असलेली आमची बांधिलकी अधिकच दृढ झाली आहे व त्यामुळे आपल्या घरांसाठी आवश्यक साहित्य शोधू पाहणा-या ग्राहकांना एकाच छताखाली आमच्या सर्व उत्पादनांचा अनुभव घेता येणार आहे. ग्राहकांना लागणा-या एकूण एक गोष्टी, त्यांच्या विशिष्ट गरजांबरहुकुम पुरविण्याच्या आमच्या क्षमतेचा लाभ होमओनर्सना मिळणार आहे. MyHome स्टोअर आणि MyHome वेबसाइट यांचे एकत्रीकरण करत आपल्या ग्राहकांना एक फिजिटल (फिजिकल+डिजिटल) अनुभव देण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading