आज सकाळी तासभर एकनाथ शिंदेंशी बोलणं झालंय – खासदार संजय राऊत

मुंबई : एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. पक्षात त्यांची कुणाशीही नाराजी नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी माझं बोलणं झालंय, असंही त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. त्यांच्या कोणत्याही अटीशर्थी नाहीत,  अशी माहिती शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी  बुधवारी सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. 

संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे आता अर्थ आणि राजकीय संदर्भही तपासले जात आहेत. तसंच राऊतांचं विधान हे बंडखोर एकनाथ शिंदे यांना चुचकारण्याचा प्रयत्न आहे का, अशीही एक शंका राजकीय जाणकार घेत आहेत. कारण सकाळीच एकनाथ शिंदेंनी उघड नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरेंनाही याबाबत कळवलं होतं. मग संजय राऊत नेमकं असं कोणत्या आधारावर बोलले, अशी शंका घेतली जातेय.

आज सकाळी तासभर एकनाथ शिंदेंशी बोलणं झालंय, असं राऊतांनी सांगितलंय. सगळे शिवसेनेत आहेत, शिवसेनेच राहणार, उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व त्यांना मान्य आहे. ठाणे, कल्याण डोंबिवलीचा सगळा कारभार एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तिथे शिंदेचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. पक्षात त्यांची कुणाशीही नाराजी नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, अशी माहिती राऊतांनी दिलीय. माझी दीर्घकाळ शिंदेंशी चर्चा झाली आहे, अशी माहितीही राऊतांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: