भर पावसात, शिवसैनिकांच्या तूफान गर्दीत मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’ प्रवास   

मुंबई : ‘शिवसेना जिंदाबाद’ची घोषणाबाजी, फुलांचा वर्षाव, भगवे झेंडे आणि भर पावसात उभ्या असलेल्या असंख्य शिवसेवकांच्या गर्दीत महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’ प्रवास पार पडला. यावेळी ठीक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या शिवसैनिकांना गाडीतून खाली उतरून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक भावनीक झाल्याचे दिसले.

जवळपास सव्वा दहाच्या सुमारास मुख्यमंत्री वर्षा निवास स्थानावरून मातोश्रीवर जाण्यास निघाले. पाऊस पडत होता. मात्र तरी देखील शिवसैनिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. रात्रीची वेळ असूनही उपस्थितांमध्ये महिलांची गर्दी मोठी होती. रस्त्यात मुख्यमंत्र्यांनी वरळी, सी लींक, हाजीआली, कालानगर जंक्शन येथे शिवसैनिकांना गाडीतून खाली उतरून अभिवादन केले. एका गाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. तर मागील गाडीत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते. सगळ्यांनी हसऱ्या चेहऱ्याने शिवसैनिकांचे अभिवाद स्वीकारले. वर्षा ते मातोश्री हे अंतर अवघ्या 10 मिनिटाचे आहे. मात्र आज टेच अंतर पार करण्यासाठी मुंख्यमंत्र्यांच्या ताफ्याला तब्बल पाऊण तास लागला.

Leave a Reply

%d bloggers like this: