पुण्यातील आघाडीच्या दोन रिअल इस्टेट डेव्हलपरच्या व्यवहाराला कॉलियर्स कॅपिटल मार्केट्स अँड इन्व्हेस्टमेंटचे सहकार्य

पुणे :  कॉलियर्स कॅपिटल मार्केट्स अँड इन्व्हेस्टमेंट या नामांकित आणि वैयविध्यपूर्ण गुंतवणूक व्यवस्थापन संस्थेने  पुण्याच्या रिअल इस्टेट  बाजारपेठेतील या तिमाहीत पार पडलेल्या दोन मोठ्या रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये, एका आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरने आपल्या प्रीमियम निवासी प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स आणि पुण्यातील एका आघाडीच्या  डेव्हलपरने  बालेवाडीत अंदाजे २. २ दशलक्ष चौरस फूट मिश्र-वापराच्या संभाव्य विकासासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे

हा प्रकल्प सध्या मंजुरीच्या टप्प्यात असून त्यात मुख्यतः मध्यम सेगमेंटमधील निवासी आणि काही पूरक व्यावसायिक मालमत्ता असणार आहेत. हे दोन्ही व्यवहार  पश्चिम भारतातील कॉलियर्स कॅपिटल मार्केट्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस (सीएमआयएस)च्या समूहाच्या साहाय्याने करण्यात आले आहे.  हे व्यवहार म्हणजे पुण्याच्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वाढीच्या संधी, गुंतवणूकदारांना शाश्वती जमीन आणि भांडवली उपाय शोधण्यातील कॉलियर्सच्या टीमची क्षमता यांचा पुरावा आहेत.

आयजीबीसी  ने प्रमाणित आणि प्लॅटिनम मानांकन दिलेले सुमारे अर्धा दशलक्ष चौरस फुटांवर पसरलेल्या आलिशान सुविधांसह हे प्रीमियम निवासी संकुल पुणे शहरातील सर्वात मोठ्या प्रीमियम निवासी संकुलांपैकी एक आहे. क्रेडाई-कॉलिअर्स-लायसेस फोरास हाऊसिंग ट्रॅकर रिपोर्ट २०२२ नुसार, गेल्या वर्षीपासून निवासी मालमत्तेच्या किमतीत सुमारे ३ टक्क्यांची  वाढ  झाली असून पुण्याच्या बाजारपेठेत चांगलीच वाढ झाली आहे. तसेच न विकल्या गेलेल्या मालमत्तांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत११ टक्क्यांची  घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक करण्यात आली आहे.

कॅपिटल मार्केट्स आणि इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, कॉलियर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष गुप्ता म्हणाले की पुणे रिअल इस्टेट मार्केट अजूनही लवचिक आहे आणि विक्री, लॉन्च, गुंतवणूक आणि पोर्टफोलिओ वाढीच्या बाबतीत अनेक घडामोडी या बाजारपेठेने पाहिल्या आहेत. हे दोन व्यवहार पुण्याच्या बाजारपेठेच्या वाढीच्या कथेवर गुंतवणूकदार आणि विकासकांच्या विश्वासाला दुजोरा देतात आणि या घडामोडी घडवून आणण्यात कॉलियर्स केंद्रस्थानी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुण्याची बाजारपेठ, जमीन आणि भांडवली संरचना यांची बारकाईने माहिती असल्यामुळे घेऊन, कोलियर्स कॅपिटल मार्केट्स टीम प्रत्येकाला फायदेशीर ठरतील असे उपाय सुनिश्चित करण्यासाठी सर्व भागधारकांसोबत घनिष्टपणे काम करण्याचा प्रयत्न करते.”

Leave a Reply

%d bloggers like this: