fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमधील घटना

सांगली – जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली.

मात्र आत्महत्ये नेमके कारण आद्यप स्पष्ट झाले नाही, आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चिठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. मृतांमध्ये डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्यासह घरातील सदस्यांच्या समावेश आहे.​​​​​ कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. सध्या मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय.

म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या संपूर्ण कुटुंबांने आत्महत्या केली आहे. कुटुंबातील साऱ्या सदस्यांनी विष घेतल्याचे समजते. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी दवाखान्यातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मोबाइल उचलत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, कुटुंबातील सर्व जण मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यांना धक्का बसला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading