महाविकास आघाडीला झटका, भाजपचे 5 उमेदवार विजयी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन व काँग्रेसचए भाई जगताप हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.
महाविकास आघाडीची एकूण २१ मतं फुटल्याची माहिती समोर येत आहे. कुणाची किती मतं फुटली याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदचे विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर (२९ ), एकनाथ खडसे (२८), शिवसेना : सचिन अहिर (२६ ), आमशा पाडवी (२६ ), भाजपा : प्रवीण दरेकर (२९ ), श्रीकांत भारतीय (३०), राम शिंदे (३० ), उमा खापरे (२७ ), प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना शेवटपर्यंत कोट्यापर्यंत मते गाठता आली नाहीत. मात्र शेवटच्या टप्य्यात भाई जगताप हे विजयी झाले.