विधान परिषदेच्या विजयाचा पुण्यात भाजपचा जल्लोष
पुणे: काल राज्यात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी चे उमेदवार निवडून आले. त्यामुळे महा विकास आघाडीला भाजपने धूळ चारली त्यामुळे काल रात्री पासून भाजपतर्फे जल्लोष सुरू झाला आहे आज भाजपतर्फे पुण्यात जल्लोष साजरा करण्यात आला.
हा जल्लोष भाजप पुणे कार्यालय येथे करण्यात आला. या जल्लोषाच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेवक धनंजय जाधव, हेमंत रासने, व भाजपचे पुणे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जल्लोषाच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवत व नाचत जल्लोष साजरा केला.
जगदीश मुळीक म्हणाले, राज्यसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सारखे महा विकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील असे सांगत होते. पण आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी परिश्रम करत भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून दिला. आता तर भाजप ची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या महापालिका व अन्य निवडणुकीत भाजपचा विजय दिसून येईल. महाविकास आघाडी सरकारने या राज्याचे वाटोळे केले आहे .असे जगदीश मुळीक म्हणाले
