जातीवाचक शिवागिळ प्रकरणी करुणा मुंडे यांना पोलिसांनी केली अटक
पुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद दिली होती.
अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील येरवडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाल्याचं समोर येतंय.
एका महिलेचा पती व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणात शर्मांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख करुणा मुंडे असे करुन दिली. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायी झाले. पती हा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले. येथे करुणा शर्मा यांनी हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.
