Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

साऊ फाउंडेशनच्या वतीने ‘गाव तिथं साऊ’ उपक्रमाची दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

 

शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा साऊ फाउंडेशनचा संकल्प; राज्यभरातून २५० जणांचा सहभाग

पुणे : ग्रामीण भागातील पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ मिळवून देण्यासह योजनांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने साऊ फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘गाव तिथं साऊ’ उपक्रमाची दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालय येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले सुमारे २५० नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे. यांनी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. योजनांची अंमलबजावणी, उपलब्ध उपक्रम आणि ग्रामीण विकासातील लोकसहभागाचे महत्त्व याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.यानंतर कार्यक्रमाला प्रा.डॉ.वृषाली रणधीर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी सामाजिक विकास, जनजागृती आणि शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.त्याचसोबत प्रवीण राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी विटा, सांगली.त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध संधी व उपक्रम तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्जप्रक्रिया आणि कागदपत्रांविषयी माहिती दिली.

यानंतर साऊ फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन करताना शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी साऊ फाऊंडेशन चे संचालक अमृत साळुंखे, गुणवंत सावळजकर, आणि संदीप कांबळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.शासकीय योजना, स्पर्धा परीक्षा, कृषी क्षेत्रातील संधी, स्वयंरोजगार, युवकांच्या सर्वांगीण विकासाच्या संधी आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला.

कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘गाव तिथं साऊ’ ॲपचे सादरीकरण शौर्यन सुरवसे यांनी केले. कार्यशाळेत ॲपचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यशाळेमुळे सहभागी नागरिक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी, कृषीविषयक संधी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार आणि सामाजिक विकासाच्या विविध पैलूंचे मार्गदर्शन मिळाले.

शासकीय योजना आणि ग्रामीण नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासह पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी ‘गाव तिथं साऊ’ हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading