महाराष्ट्रात राजकीय भूकंप : शिवसेनेत फुट; एकनाथ शिंदे यांच्यासह 25 आमदार नॉट रीचेबल
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाच जागांवर विजय झाला आहे. .यामुळे शिवसेना व कॉँग्रेसची काही मते फुटल्याची चर्चा सुरू असतानाच राज्यात राजकीय भूकंप झाला असून राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 4 मंत्री आणि 25 आमदार नॉट रीचेबल झाले असून शिंदे गुजरात मध्ये रातोरात पोहचले आहेत.
विधान परिषदेतील निकालानंतर भाजपचे विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ‘विधान परिषदेतील निकाल ही परिवर्तनाची नांदी’ असे म्हणत प्रतिक्रिया दिली होती. मात्र राज्यात आता सरकार आणणार का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. ‘राज्यात महाविकास आघाडीमध्ये अनेक आमदार नाराज आहेत. आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे’, असे ते म्हणाले.
गेल्या विधानसभेत भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढले होते. त्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप वेगळे झाले. आणि अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. दरम्यान शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे नोटरीचेबल आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर १३ आमदार असल्याचे समजत आहे. त्यात काही मंत्री आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलही त्यांच्याबरोबर आहेत असे समजत आहे.
राज्य सरकार कोसळयाण्याबाबत अनेकदा मुहूर्त सांगण्यात आले होते. मात्र सरकार कोसळले नाही. आता मात्र राज्यसभेनंतर विधान परिषदेत ठाकरे सरकारला धक्का बसला आणि त्यानंतर काही तासातच शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे नोटरीचेबल झाले आहेत. सुरत येथील हॉटेल ली मॅरिडनमध्ये ते आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा फडणवीस यांचे सरकार येणार का हे पहावे लागणार आहे.
शिवसेनेच्या आमदारांची आज १२ वाजता मुंबईत बैठक होणार त्यापूर्वी शिंदे हे देखील सुरतमध्ये पत्रकार परिषदे घेणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील नेते होते. मात्र त्यांना मुख्यमंत्री न करत ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील अनेक आमदार महाविकास आघाडीमध्ये नाराज आहेत.
