Wednesday, September 9, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात रंगणार ‘तालचक्र’ तर्फे ‘tgi शुक्रवार’ संगीत महफ़िल


पद्मश्री पं. विजय घाटे निर्मित प्रचलित असलेल्या ‘तालचक्र’ तर्फे ‘tgi शुक्रवार’ या  कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात शुक्रवार दिनांक २४ जून २०२२ रोजी डेंगळे आर्ट गॅलरी, पौड रोड येथे कारण्यात येणार आहे.  शुक्रवार दिनांक २४ जून रोजी ग्वाल्हेर, जयपुर, आग्रा तसेच भातखंडे घराण्याची परंपरा लाभलेले गायक डॉ. राम देशपांडे यांचे गायन होणार आहे. त्यांच्या बरोबर तबल्यावर  पं. विजय घाटे व हार्मोनियमवर श्री आभिषेक शिनकर साथ करणार आहेत.


चंदूकाका सराफ अँड सन्स हे या कार्यक्रमाचे प्रयोजक आहेत. विशेष म्हणजे ‘tgi शुक्रवार’ हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी वेगवेगळ्या कलाकारांबरोबर रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. तालचक्र तर्फे हा कार्यक्रम कला व संगीत प्रेमींकरिता मोफत ठेवण्यात आला आहे. स्थळ : डेंगळे आर्ट गॅलरी, अलकापुरी सोसायटी,वणज कॉर्नर, उद्यम विकास सह. बँक च्या वर, पौड रोड, पुणे. कार्यक्रमाची वेळ:-  सायंकाळी ६:३० वाजता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading