झीअसेट्स आणि ब्रह्माकॉर्पच्या भागीदारीतून बालेवाडीत सुसज्ज ब्रह्माकॉर्प टाऊनहाऊस सादर
पुणे: भारतातील आघाडीचे वेगाने वाढणारे निवासी रेंटर इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्म झीअसेट्सने ब्रम्हाकॉर्प या आघाडीच्या लक्झरी डेव्हलपरसह भागीदारी करत पश्चिम पुण्यातील बालेवाडी या प्रमुख स्थानावर ब्रम्हाकॉर्प टाऊनहाऊस सादर केले आहे. ब्रम्हाकॉर्प टाऊन हाऊसमध्ये जीवनशैलीला पूरक असणारे स्मार्ट आणि पूर्णपणे सुसज्ज स्टुडिओ अपार्टमेंट ऑफर करण्यात आले आहेत. स्टुडिओ अपार्टमेंटस गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असून रिअल इस्टेट उद्योगातील स्टुडिओसला आता मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
झीअसेट्स या भागीदारीच्या माध्यमातून भांडवली वाढीसह अंदाजे ३. ५ हजारांच्या सर्वात कमी निव्वळ ईएमआय सह ५ टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीवर परताव्याची (आरओआय) स्मार्ट गुंतवणूक ऑफर करत आहे . या स्मार्ट घरांमध्ये खाजगी बाल्कनीसह जागेचा कमाल वापर, डिजिटल डोअर लॉक, मोशन सेन्सर लाइटिंग सिस्टम, व्हिडिओ डोअरबेल व ऑल व्हाईट वस्तू आणि भांडी असलेले स्वयंपाकघर यांसारख्या भविष्यकालीन सुविधांसह ऊर्जा-कार्यक्षम एसी घरे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ब्रम्हाकॉर्प टाउनहाऊसमधील स्टुडिओ अपार्टमेंट्स पुण्यातील घरांच्या संकल्पनेची नव्याने व्याख्या करत आहे
झीअसेट्सचे सीईओ सरबजीत कुकरेजा म्हणाले की आम्ही आमच्या निवडक किंवा क्युरेटेड उच्च परतावा आणि उच्च उत्पन्न देणार्या प्रस्तावांद्वारे प्री लीज्ड निवासी मालमत्ता बाजारात उलथापालथ घडविण्याच्या दिशेने सज्ज आहोत. ही एक वाढती बाजारपेठ असून सद्य परिस्थितीमधील मूल्य ६.६७ अब्ज डॉलर मूल्य असून येत्या काही वर्षांत १३.९२ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. स्मार्ट, परवडणारी आणि सुसज्ज मालमत्ता किंवा स्टुडिओद्वारे या मालमत्ता वर्गाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम लक्झरी डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या ब्रह्माकॉर्पसोबत भागीदारी करणे हे आमचे भाग्य आहे जेणेकरून अगदी नाममात्र निव्वळ ईएमआय गुंतवणुकीवर अधिक रेंटल उत्पन्न निर्माण होईल.”
ब्रम्हाकॉर्प लिमिटेडचे सहअध्यक्ष दिनेश अग्रवाल म्हणाले की पुण्यात आलिशान घरांच्या संकल्पनेला नवा अर्थ देण्यात आम्ही आघाडीवर आहोत. झीअसेट्स हा एक असा भागीदार आहे ज्याला आम्ही ओळखतो आणि ज्यावर आम्हाला विश्वास आहे. ब्रम्हाकॉर्प टाऊनहाऊस हा रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या बाजारात एक नवीन बेंचमार्क सेट करेल आणि लोकांच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत बदल करेल. उत्पादन आणि गुणवत्तेशी तडजोड न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे सर्वसामान्यांसाठी परवडणारी करण्याचे आमचे ध्येय आहे.”
