fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

बेशिस्त वाहनचालकांना रोखा अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जा -पुष्कर तुळजापूरकर

पुणे :  मध्यवर्त भागात आधीच वाहतुकीचा बोजवारा उठला असताना फडके हौद चौक ते सोन्या मारुती चौक या टप्प्यामध्ये अनेक वाहनचालक हे नो एन्ट्री असताना फडके हौद चौकातून सोन्या मारुती चौकातून उलट्या दिशेने बिनधास्त जात असतात पर्यायी रस्ता उपलब्ध असून हे वाहनचालक फडके हौद चौक येथून सोन्या मारुती चौकाकडे बेशिस्तपणे गाडी चालवत जातात या मध्ये दुचाकी ,रिक्षा,आणि चार चाकी गाड्यांचा समावेश आहे हे एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.
फडके हौद चौक हा वर्दळीचा चौक असून इथे अनेकवेळा वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते त्यात सणासुदीला तर विचारायची सोया नाही हा वाहतूक शाखेचा एक मुख्य पॉईंट असून इथे अनेकवेळा कर्मचारीच उपलब्ध नसतो बरं जो असतो तो कोपऱ्यात उभा राहून नागरिकांची गम्मत बघतो की काय असा संशय उत्पन्न होतो
ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी फरासखाना वाहतूक विभागाला आज पत्राद्वारे बेशिस्त वाहनचालकांना रोखा अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जाअसा इशारा दिला आहे वाहतूक पोलीस याबाबत कारवाई करतात का हे बघावे लागेल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading