fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

आय.सी.एस.आय तर्फे प्रॅक्टिसिंग कंपनी सचिवांच्या २३ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे: इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया तर्फे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीच्या २३ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १८ व १९ जून दरम्यान लोणावळा येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचा मुख्य विषय ‘कंपनी सेक्रेटरी- अ प्रिफर्ड प्रोफेशनल’ आहे अशी माहिती आयसीएसआय चे अध्यक्ष सीएस देवेंद्र देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी सीएस आशिष मोहन( सेक्रेटरी आयसीएसआय), सीएस मनिष गुप्ता( उपाध्यक्ष आयसीएसआय), सीएस राजेश तर्परा( चेअरमन डब्लूआयआरसी), सीएस संजय पठारे(चेअरमन पुणे चाप्टर ऑफ डब्लूआयआरसी ऑफ आयसीएसआय) उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देताना सीएस देवेंद्र देशपांडे, अध्यक्ष आयसीएसआय म्हणाले, “नियामक वातावरणातील बदलत्या गतीशीलतेच्या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीची कंपनी कायदे बनवण्यामध्ये असलेली भूमिका व जबाबदारी यांचा शोध घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. ही परिषद म्हणजे व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल जेणेकरून मूल्य-आधारित व्यावसायिक म्हणून, कंपनी सचिवांना नियामक प्राधिकरणांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सुसज्ज होण्याकरिता मदत होईल.”
याआधी आयसीएसआयने प्रथमच दुबई येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन देखील केले होते जेणेकरून विविध देशातील व्यवसाय नियामक ज्ञानाची देवाणघेवाण करता आली. या परिषदेची थीम सुशासनाची पुनर्व्याख्या:(रिडीफायनिंग गुड गवर्नन्स) नवोपक्रम (इनोव्हेशन), अनुपालन(कमप्लायंस) , शाश्वतता( ससस्टेनॅबिलीटी) आणि समावेश( इनक्लूजन)ही होती. या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक तज्ज्ञांनी व वक्त्यांनी सहभाग घेतला होता.
कॉर्पोरेट कार्य मंत्रालय तर्फे आयोजित स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमात देखील आयसीएसआय ने भाग घेतला होता. यावेळी कायदे व न्याय व्यवस्था( लॉ ॲन्ड जस्टीस) मंत्री  किरेण रिजिजू, व राजेश वर्मा ( आयएएस, सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेर्स) यांनी ‘इंडिया @७५: गव्हर्नन्स मधील  व्यावसायिकांची भूमिका’ व भारत: सुशासनाला चालना देणारे विश्वगुरु या विषयावर आपले संशोधनात्मक व्याख्यान सादर केले.
देवेंद्र देशपांडे पुढे म्हणाले, “आयसीएसआय ने डिजिटल विभागात क्रांतिकारक प्रगती केली आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सदस्यांसाठी अनेक डिजिटल सुविधा सादर करत आहोत. ज्यामध्ये डिजिटल लर्निंग, खाजगी डीजी लॉकर, युनिक आयडेंटीफिकेशन नंबर इत्यादी सुविधांचा समावेश आहे.” “या शिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्रॅम देखील आम्ही आणले आहेत ज्यामध्ये एक्झीक्युटिव्ह ट्रेनिंग प्रोग्रॅम, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि कॉर्पोरट लीडरशिप प्रोग्रॅम चा समावेश आहे. तसेच सीएस व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी आम्ही इंटरनॅशनल सायन्स ऑलंम्पियाड सोबत करार करून इंटरनॅशनल कॉमर्स ऑलंम्पियाडचे देखील आयोजन करणार आहोत. विशेष म्हणजे आम्ही युजीसी सोबत केलेल्या संयोगामुळे त्यांनी  कंपनी सेक्रेटरी कोर्सला पदव्युत्तर पदवी समतुल्य म्हणून मान्यता दिली आहे” असे प्रतिपादन श्री देवेंद्र देशपांडे यांनी केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading