fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsLIFESTYLE

फॅशन शो च्या माध्यमातून देणार एचआयव्ही बाधितांना मदत

पुणे : कशीश प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ आणि लहान मुलांसाठी ‘RISING STAR’ या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शो मधून जमा होणाऱ्या निधीतील काही रक्कम ही एच. आय. व्ही. ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थांना दिली जाणार आहे, अशी माहिती कशीष प्रॉडक्शन्सचे संस्थापक  आणि मॉडेल ग्रुमर व अभिनेता – दिग्दर्शक योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला ब्रँड अॅम्बेसेडर रेश्मा पाटील, महाराष्ट्र शो डायरेक्टर नम्रता काळे, अंजली रघुनाथ वाघ, नेहा घोलप- पाटील, अंकुश पाटील, डॉ दत्तात्रय सोनवलकर आदी उपस्थित होत्या.

योगेश पवार म्हणाले, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी online audition चालू झाल्या असून पुणे, मुंबईसह ग्रामीण भागातून सुद्धा अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. मात्र राज्यभरातून आलेल्या एकूण  एंट्रीज मधून केवळ 100 जणांची या स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. सौंदर्य स्पर्धा म्हटंले की सहभागांसाठी अनेक निकष लावले जातात. पण या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय, वजन, ऊंची याचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाही. ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे.

या Mr., Miss स्पर्धेत भाग घेण्यासाठी वय वर्ष 30 ही वयोमर्यादा आहे. तर Mrs. स्पर्धेसाठी कोणतीही वयोमार्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच RISING STAR या लहान मुलांच्या स्पर्धेत 3 ते 14 वर्ष वयोगटातील लहान मुलं भाग घेवू शकतात. स्पर्धेची फायनल ही 19 जुलै 2022 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे रंगणार आहे. त्यापूर्वी मोठ्यांसाठी तीन दिवस व लहान मुलांसाठी दोन दिवस ग्रुमिंग असणार आहे. तसेच मोठ्यांसाठी टैलेंट राऊंड देखील असणार आहे.

पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले, या स्पर्धेतून जमा होणाऱ्या निधीतून काही रक्कम ही एच. आय. व्ही.ग्रस्त रुग्णांना मदत म्हणून दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9049505859या क्रमांकावर संपर्क साधावा असे पवार यांनी सांगितले. या फॅशन शो चे विशेष सहकार्य’ Rajasa by Ishan Ethnic collection’ आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading