fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

क्रॉम्प्टनकडून ‘क्रॉम्प्टन सिग्नेचर स्टुडिओज’च्या उद्घाटनासोबत पुण्यात बिल्ट इन किचन अप्लायन्सेसचे अनावरण

पुणे, : आज क्रॉम्प्टनने आपल्या नवीन बिल्ट इन किचन अप्लायन्सेस उत्पादनांचे अनावरण पुणे आणि पीसीएमसी क्षेत्रात केले आहे. आमच्या उद्घाटनाच्या साखळीतील पुणे हे पहिले शहर असून आगामी आठवड्यांमध्ये ही उत्पादने भारतभरातील १० मोठ्या महानगरांमध्ये उपलब्ध होतील.

क्रॉम्प्टनने ३८ मॉडेल्सच्या एका सर्वसमावेशक श्रेणीचे उद्घाटन केले आहे. त्यात चिमणी, गॅस हॉब्स, बिल्ट इन ओव्हन, बिल्ट इन मायक्रोवेव्ह्ज आणि डिशवॉशर्स यांचा समावेश आहे. ही उत्पादने ग्राहकांचे आयुष्य किचनमध्ये आनंददायी आणि आरामदायी बनवण्याच्या हेतूने ग्राहक संशोधन करून तयार करण्यात आली आहेत. क्रॉम्प्टनच्या इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट टीम्सनी आपल्या ज्ञानाचा वापर ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, एअर मॅनेजमेंट आणि वापरकर्ता अनुभव व युजर इंटरफेस या क्षेत्रात वापरला आहे.

ही उत्पादने नावीन्यपूर्ण आणि बाजारात अस्तित्वात असलेल्या उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे ती ग्राहकांसाठी आकर्षक ठरतात:

कमी आवाज आणि शक्तिशाली चिमण्या ज्या एसीसारख्या शांत आहेत (सुमारे ५० टक्के कमी आवाज) आणि २००० सीएमएच इतके जास्त सक्शन देऊ शकतात.
ऑटो ऑन आणि ऑटो क्लीन वैशिष्ट्यांसह असलेल्या या स्मार्ट चिमण्या ज्या स्वयंपाक सुरू असताना आपोआप सुरू होतात आणि वेळोवेळी स्वतःची स्वच्छता करतात.
गॅस हॉब्स सुरक्षेसाठी एका फ्लेम फेल्युअर सेफ्टी साधनाने आणि डिजिटल टायमरने युक्त आहेत, जे ठरलेला वेळ संपल्यानंतर बर्नर आपोआप बंद करतात.
उत्तमरित्या सुकवण्यासाठी टर्बो ड्राइंग तंत्रज्ञानासह येणारे डिशवॉशर्स.
स्टीम पल्स टेक्नॉलॉजीसोबत येणारे बिल्ट इन ओव्हन्स. त्यामुळे भारतीय अन्नपदार्थ आणि जागतिक खाद्यपदार्थ शिजवणे सोपे जाते.

आम्ही आमच्या ग्राहकांना एक उत्तम उत्पादन आणि ब्रँड अनुभव देण्यासाठी क्रॉम्प्टन सिग्नेचर स्टुडिओज स्थापित करत आहोत. हे स्टोअर्स ग्राहकांचे प्राधान्य लक्षात ठेवून उत्पादनांच्या सहज निवडीसाठी तयार करण्यात आले आहेत आणि त्यासोबत अत्यंत अनुभवी विक्री सल्लागारही असतील.

पुण्यात ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी खालील क्रॉम्प्टन सिग्नेचर स्टुडिओज तयार आहेत:

1. श्री चामुंडा होम अप्लायन्सेस, संतोष हाइट्स, दुकान २ आणि ३, अप्सरा थिएटरसमोर, शंकर शेठ रोड, पुणे- ३७

2. शर्मन एंटरप्रायझेस, दुकान ५ आणि ६, जगन्नाथ कृपा सदन, बाणेर- महाळुंगे रोड, पुणे- ४५.

3. राजदीप एंटरप्रायझेस, शगुन चौक, शास्त्री नगर, पिंपरी कॉलनी, पुणे- १७.

या अनावरणाबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक मॅथ्यू जॉब म्हणाले की,“आम्ही आगामी तीन वर्षांमध्ये या क्षेत्रातील सर्वोच्च तीन कंपन्यांपैकी एक होण्याचे ध्येय ठेवतो. आम्ही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून आमच्या क्षमतांचा विस्तार करत आहोत. नेतृत्व आमच्या डीएनएमध्ये आहे आणि आमच्या आगळ्यावेगळ्या मूल्याद्वारे आम्ही या क्षेत्रातही आघाडी घेऊ, अशी आम्हाला खात्री आहे.”

नवीन व्यवसायाचे उपाध्यक्ष नितेश माथुर म्हणाले की,“क्रॉम्प्टनने त्यांच्या ग्राहकांच्या क्षेत्रात खूप ज्ञान प्राप्त केले आहे आणि एका वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणीद्वारे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतील. आम्हाला अनेक आघाडीच्या मोड्यूलर किचन डीलर्स आणि मल्टी ब्रँड आऊटलेट्सकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याशिवाय आम्ही क्रॉम्प्टन सिग्नेचर स्टुडिओचे प्रीमियम खास ब्रँड आऊटलेट्सही स्थापन करत आहोत. मी आमच्या सिग्नेचर स्टुडिओ भागीदार आणि इतर चॅनल पार्टनर्सप्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading