fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महानगरपालिका निवडणुकांनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर ओबीसी आरक्षणामुळे महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लाबल्या त्या झाल्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील, असे सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

ऊस गाळप हंगाम 2021-22 बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, पांडुरंग शेळके उपस्थित होते.

महाराष्ट्रात यंदाचा साखर हंगाम आव्हान होते. राज्यात साखर कारखानदारी वाढावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले आणि ऊस क्षेत्र आणि कारखाने वाढले आहे. मराठवाड्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणत वाढले आहे. ऊस हंगाम यंदा बरेच दिवस चालला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पाऊस चांगला झाल्याने ऊस क्षेत्र वाढले आणि हीच परिस्थिती आगामी काळात राहणार आहे. शेतकरी, कारखाने यांच्यासमोर ऊस तोडणी प्रश्न निर्माण झाल्याने यावेळी ॲप तयार करण्यात आले; असून पुढील काळात त्याचा वापर करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

साखर कारखानदार माध्यमातून हर्वेस्टर वापर वाढविण्यात येत आहे. हर्वेस्टर गरज लक्षात घेता त्याचे वाहतुकीचे दर वाढविण्यात आले आहे. कारखाने हर्वेस्टरला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने हर्वेस्टर खरेदीस अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. आगामी हंगाम लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. 25 हजार मेट्रिक टन ऊस क्षेत्र वाढलेले आहे. ऊस क्षेत्राशी निगडित लोकांनी सहकार्य दिल्याने विविध अडचणींवर मात करता आली. एक ऑक्टोबर रोजी यंदा कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सरासरी हंगाम यंदा 173 दिवस तर अधिकाधिक 240 दिवस चालला आहे, असेही  बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading