मातृतिर्थ सिंदखेडराजा अभिवादन यात्रेचे संभाजी ब्रिगेडने केले स्वागत
पुणे: राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवश्री शिवाजीराजे जाधवराव यांच्या नेतृत्वात निघालेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजा ते पाचाड ( रायगड ) अभिवादन यात्रेचे वाघोली येथे स्वागत करण्यात आले, यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शंभुराज्याभिषेक सोहळा संस्थापक शेखर पाटील, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, पठाण सर, कामगार आघाडीचे संदीप मोरे, उपस्थित होते.
चंद्रशेखर घाडगे म्हणाले, आम्ही दरवर्षी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त मातृतिर्थ सिंदखेडराजा यात्रेचे आम्ही स्वागत करत असतो.मागच्या 2 वर्षी कोरोना मुळे ही यात्रा निघाली नव्हती पण या वर्षी अतिशय उत्साहात ही यात्रा निघाली आहे. आम्हि त्याचे स्वागत करतो. असे चंद्रशेखर घाडगे म्हणाले.