fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

दलित पँथरसारखा लढा उभारणे काळाची गरज- सुशीलकुमार शिंदे

पुणे  : सर्व दलीत ,उपेक्षित वंचित समाजाने एकत्र येऊन पुन्हा एकदा दलीत पँथर सारखा लढा उभारणे काळाची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले . ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे अमृतमहोत्सवानिमित्त व त्यांच्या दलीत पँथर एक अधोरेखित सत्य ग्रंथ यानिमित्त त्यांचा पुण्यातील आंबेडकरी चळवळीच्या व पुणेकर नागरिक यांच्या वतीने पुण्यात गौरव सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.


पुढे ते म्हणाले की आजचे सामाजिक संदर्भ ,प्रश्न बदलले आहेत परंतु दलीत उपेक्षित माणसाला एकत्र यावे लागेल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे ते म्हणाले .अर्जुन डांगळे यांनी दलीत पँथर साठी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे आणि आज त्यांच्या ग्रंथातून तो इतिहास भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला .
यावेळ माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तर बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक ,नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणात  डॉ.बाबा आढाव म्हणाले की ,भारतीय लोकशाही धोक्यात आली असून घटनेतील भारत निर्माण करायचा असेल तर त्याविरोधात मोठा लढा उभारावा लागेल .त्यासाठी आता सर्वांनी काम केले पाहिजे .नाहीतर पुढील दिवस सर्वासाठी आव्हानाचे असतील .त्याचेप्रमाने त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना सर्व चळवळी ना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.यावेळी त्यांनी अर्जुन डांगळे यांच्या सोबत दलीत पँथर मधील अनेक आठवणी सांगितल्या .व दलीत पँथर चे दिवस समोर उभे केले .
अर्जुन डांगळे आपल्या मनोगतात म्हणले की आज दलीत चळवळी आणि पक्षाला थिंक टॅकची (मार्गदर्शक )गरज आहे .

या सोहळ्यास माजी मंत्री रमेश बागवे ,माजी आमदार उल्हास पवार ,ऍड.जयदेव गायकवाड, ऍड.भाई विवेक चव्हाण , रिपबलिकन पार्टी चे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण ,अंकल सोनवणे ,वसंत साळवे या सोहळ्याचे संयोजक शैलेंद्र मोरे यासह विविध पक्ष संघटनेचे नेते आणि पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे व समितीचे मुख्य संयोजक शैलेद्र मोरे यांनी प्रास्ताविक केले ,सूत्रसंचलन दीपक मस्के यांनी केले तर आभार माजी नगरसेवक अविनाश साळवे यांनी मानले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading