सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन उद्या
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक १७ जून रोजी दु. १२ वा. आयोजित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मौजे शिवनई ता. दिंडोरी येथे सुमारे ६३ एकर परिसरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उपकेंद्र सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या शासनाच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. या उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.
मुख्यमंत्री हे या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी डॉ. आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादाजी भुसे, विधानसभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम प्रा. डॉ. कारभारी काळे कुलगुर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.