fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

मार्वल रिअलटर्सच्या लक्झरी प्रॉपर्टीजमध्ये १०० टक्क्यांची भांडवली वाढ

पुणे  : प्रख्यात लक्झरी रिअल इस्टेट डेव्हलपर, मार्वल रिअलटर्स ने बाजाराच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तांच्या पुनर्विक्री मूल्यात सातत्याने वाढ नोंदवली आहे. मार्व्हल आर्को, हडपसर यांनी पुनर्विक्री मूल्यात १०७ टक्के  ,मार्वल सेरीझ, खराडी  १०४  टक्के , मार्वल ब्रिसा, बालेवाडी  १०० टक्के  , मार्व्हल कास्काडा, बालेवाडी ८० टक्के आणि मार्वल सेल्वा रिज इस्टेट, बावधनने ४५ टक्क्यांची  नोंद केली आहे.  पुण्यातील मार्वलच्या लक्झरी प्रॉपर्टीचे वर्षानुवर्षे होणारे मूल्य मापन एकूण प्रमाणा च्या तुलनेत २०  टक्क्यांपेक्षा  जास्त आहे. एकूणच, मार्वल प्रॉपर्टीज पुण्यातील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये आघाडीवर आहेत आणि गेल्या वर्षभरात त्याच परिसरातील इतर प्रीमियम प्रॉपर्टीजच्या तुलनेत  -३ टक्के  ते ८ टक्के वाढीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना ७ टक्के ते  १२ टक्के  वाढीचा फायदा होत आहे.

मार्वल हे आयकॉनिक लक्झरी डिझाईन्स आणि कार्यक्षम लेआउटसाठी ओळखले जाते. त्यांच्या डिझाईन तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, त्यांचे अपार्टमेंट्स मार्केट ऑफरच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत  पर्यंत मोठे आहेत. मार्व्हल अपार्टमेंट्समध्ये मार्व्हल ऑरम, कोरेगाव पार्क ५,२०० चौ. फूट, मार्वल सेल्वा रिज इस्टेट, बावधन ३,२५० चौ. फूट ते १४,००० चौ. फूट, मार्व्हल संगरिया, मार्व्हल संगरिया, एनआयबीएम  मध्ये रोड ऑफरिंग १,७१० चौ. फूट ते ७,००० चौ. फूट यांसारख्या विस्तृत जागा दिल्या आहेत. मार्व्हल अ‍ॅक्वानास, खराडी ३,५००चौ. फूट ते ७,००० चौ. फूट आणि मार्व्हल पियाझा, विमान नगर १,४०० चौ. ते ६,५०० चौ. फुटांपर्यंतचे अपार्टमेंट मध्ये मोकळी जागा अशा प्रशस्त निवासस्थानांची ऑफर देणारे मोजकेच विकासक असल्यामुळे आणि प्रशस्त आणि विलासी राहणीमानाची मागणी असलेल्या मार्व्हलने अधिक भांडवल वाढीसह आपल्या स्पर्धकांना मागे टाकले आहे आणि त्यामुळे त्यांच्या गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला आहे. मार्वलच्या अनेक विद्यमान ग्राहकांनी तब्बल ३ते ५ मार्वल निवासस्थानांमध्ये गुंतवणूक केली आहे.

गेल्या३  वर्षात, जागतिक महामारीसह अत्यंत आव्हानात्मक वातावरण असतानाही मार्वल रिअलटर्स ने १६०० हून अधिक आलिशान निवासस्थाने (अपार्टमेंट आणि व्हिला) दिली आहेत. ऑलिम्पिक आकाराचे पूल, व्यावसायिक मानक क्रीडा सुविधा, केबिन, घरातून कामासाठी डेस्क आणि वाहनमुक्त हिरवीगार जागा यासह अनेक सुविधांद्वारे ३६० -डिग्री लक्झरी जीवनशैलीवर अनेक प्रकल्पांमध्ये लक्ष केंद्रित करून हा ब्रँड नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांना आनंद देत आहे.

अद्वितीय संकल्पनेसह डिझाइन केल्यामुळे, प्रत्येक मार्वल प्रॉपर्टीजना कित्येक वर्षांनंतरही वाढीव आकर्षण आहे. मार्वल प्रकल्पांना ग्राहकांच्या स्पेक्ट्रमची पसंती आहे ज्यात सामुदायिक जीवन जगू पाहणारी कुटुंबे, सेवानिवृत्ती गृहांचा विचार करणारे एचएन आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीची संधी शोधणारे गुंतवणूकदार यांचा समावेश आहे. मार्वलसाठी आणखी एक फरक म्हणजे त्याच्या प्रकल्पांच्या स्थानाची धोरणात्मक निवड. प्रत्येक मार्वल प्रॉपर्टीजना प्राइम आणि किंवा आगामी भविष्यात येणाऱ्या प्रॉपर्टीजना अश्या प्रकारे विकसित केले जाते ज्यामध्ये भांडवल वाढीची उच्च क्षमता असते आणि त्याचबरोबर तेथील रहिवाशांच्या लक्झरी राहणीमानातही भर पडते. उदाहरणार्थ, खराडीच्या आगामी पूर्वेकडील उपनगरात स्थित मार्व्हल एक्वानास विविध आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रांच्या सान्निध्यात मुळा-मुठा नदीचे अखंड आयुष्यभर दृश्य देते. कोरेगाव पार्कच्या प्राइम लोकेशनमध्ये प्रति मजल्यावर फक्त १ अपार्टमेंट असलेले मार्वल ऑरम पुण्यातील सर्वोत्तम खास राहण्याचा अनुभव देते.

सामुदायिक राहण्यासाठी मध्यवर्ती चौकांसह एक आकर्षक युरोपियन शहर म्हणून डिझाइन केलेले मार्वल पियाझा विमानतळाला लागून असलेल्या विमान नगरच्या युनिक परंतु चांगल्या प्रकारे जोडलेल्या भागांमध्ये स्थित आहे. बावधनमधील मार्वल सेल्वा रिज इस्टेट पुणे-मुंबई महामार्गाच्या प्रवेशयोग्यतेसह आणि पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या हिरवळीच्या जंगलात वसलेले आहे. दुसरीकडे, मार्वल संग्रिया, एनआयबीएम  रोड येथे स्थित आहे, पूर्व पुण्यातील एक भव्य व्यवसाय आणि व्यापार केंद्र आहे. हे सर्व प्रकल्प एकतर ताब्यात घेण्यासाठी तयार आहेत किंवा पुढील ६महिन्यांत ताब्यात घेण्यासाठी तयार होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading