fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विविध मागण्या यश

पुणे : लवकरच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू होतील. पण, काही महाविद्यालयांमध्ये फी आकारणी चुकीच्या पध्द्तीने केली जाते. याबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने वेळोवेळी शिक्षण उपसंचालकांसोबत पत्रव्यवहार व निवेदने दिली. आज पुण्यातील शिक्षण उपसंचालकांना भेट दिल्यानंतर खालील प्रश्नांबाबत कठोर कारवाई सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी राज्यसदस्य तुकाराम डोईफोडे, पुणे जिल्हाध्यक्ष छाया काविरे व सौरभ शिंपी आदी उपस्थित होते.

छात्रभारतीच्या मागण्या – महाविद्यालयाच्या शुल्क बाबत समिती नेमावी व त्यामध्ये सर्वाना एकच शुल्क ठरवून घ्यावे. प्रत्येक महाविद्यालयात शुल्क फी चा बोर्ड कॉलेज बाहेर लावण्यास सांगावे, यामुळे पारदर्शकता दिसेल. 11वि ची प्रवेश प्रक्रिया चालू वर्षी वेळ न घालवता तात्काळ सुरु करावी व नियमाने राबवावी. ज्यामहाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करून लुट केली जाईल अश्या महाविद्यालयाची चौकशी समिती नेमून चौकशी करावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading