Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

विनोद पटकोटवार यांची रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

पुणे : पुणे स्थित रबर उद्योगातील प्रतिथयश उद्योजक विनोद पटकोटवार यांची रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर निवड करण्यात आली आहे. यापुढे परिषदेच्या कामकाजाची देखरेख, तसेच रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल या क्षेत्रांशी संबंधित उद्योगांचा विकास व्हावा यासाठी संचालक मंडळाशी समन्वय साधून धोरणात्मक पावले उचलणे आदी जबाबदाऱ्या पटकोटवार यांच्यावर असतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेचची स्थापना २०१२ या वर्षी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली करण्यात आली. परिषदेचे मुख्य उद्दिष्ट हे रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल उद्योगांशी संबंधीत योग्य असे प्रशिक्षण उपलब्ध करून देत देशातील तरुणांना या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे असे आहे.

रबर उद्योगातील एक यशस्वी उद्योजक अशी ओळख असलेल्या पटकोटवार यांनी याआधी या व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांमध्ये महत्वाची पदे भूषवली आहेत. यामध्ये पामुख्याने ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसीएशन या राष्ट्रीय स्तरावर काम करण्याऱ्या संस्थेच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्ष पदाचा समावेश आहे. रबर, डाइज आणि मोल्ड्स या राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायीक प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन देखील पटकोटवार यांच्याच नेतृत्वात करण्यात आले होते.  पटकोटवार यांनी ६ वर्षांपासून अधिक काळ रबर इंडिया या मासिकाचे संपादक म्हणून काम पहिले आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यावर पटकोटवार म्हणाले, “गेल्या दशकात रबर उद्योगात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांच्या अनुषंगाने आवश्यक असे कौशल्य प्रदान करण्यासाठी रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेतर्फे उभारलेल्या यंत्रणेने मोठे योगदान दिले आहे. ज्यामध्ये परिषेदेने सुरु केलेल्या समर्थ आणि उत्थान या दोन उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे. संबंधीत उद्योगात कार्यरत असलेल्या लघु व मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिक संस्थांनी परिषदेच्या मदतीने या क्षेत्रात असलेल्या भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading