सदाभाऊ आमच्याकडे होते तेव्हा शेतकरी नेते होते आता ते काय आहेत हे मला माहित नाही – खासदार राजू शेट्टी
पुणे : माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेचा आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या माझ्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे राजकारणात घोडेबाजार आणि इतर विषयावर बोलायला वेळ नाही. सदाभाऊ आमच्याकडे होते तेव्हा शेतकरी नेते होते, आता ते काय आहेत हे मी ऐकून नाही, असा टोला स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.
ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. आज राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राजू शेट्टी म्हणाले, आजच उसाचा गाळप हंगाम संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा विक्रमी उसाचे गाळप झाल्याचेही साखर आयुक्तींनी सांगितले आहे.शिल्लक ऊस , थकीत एफ. आर. पी यासह विविध विषयांच्या संदर्भात ते आयुक्तांशी त्यांनी चर्चा केलीय. महाराष्ट्रात शिल्लक ऊस किती? बंद साखर कारखान्यांनी किती इथेनॉल निर्मिती केली याची साखर आयुक्तांकडून माहिती घेतली, तसेच साखर आयुक्तांचा दावा आहे की राज्यातले सर्व कारखाने आज बंद झालेत, गाळपाचा ऊस राज्यात शिल्लक नाही, असा दावा केलाय, आम्ही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांकडून या दाव्याची सत्यता तपासू, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.
साखर कारखान्याच्या ऑडिटबाबत राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर मधल्या केवळ 12 कारखान्यांचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ऑडिट झालं आहे. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दल आमचा आक्षेप आहे, हे ऑडिट कसं करणार? आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष आहेत, आणि नातू साखर कारखान्याचा अध्यक्ष असेल तर ऑडिट कस होणार? अशी टीका शेट्टी यांनी शरद पवार, रोहित पवार यांचे नाव न घेता केली. तर तुकड्या तुकड्यात एफआरपी मिळत आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही शेट्टी म्हणाले.
बंद पडलेले कारखाने सुरू केले तर पुढच्या वर्षी साखर गाळप प्रश्न भेडसावनार नाही. पुढच्या वर्षी एक रक्कमी एफआरपी घेण्यावर आम्ही ठाम आहोत. ऊस तोडणी महामंडळ यांनी मजुरांची नोंदणी करावी. त्यांना टनामागे 10 रुपये दिली जात आहेत. तसेच मजुरांची सुरक्षा महत्वाची आहे ती शेतकऱ्यांना त्यांना द्यावी, असे राजू शेट्टी म्हणाले.
